पान:संगीत शिवलीलामृत.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय चौथा. RAHA सार्वजनिक मानना खेड, (पुणे.) साको करुणासिंधू कर्पुरगौरा रक्षण करि तू आता सेवक तुमचा संकटि पडला कोण दुजा रे त्राता ।। तुजविण कोणि नसे ॥ तव चरणी मी लीन असे ॥ १ ॥ महाकालेश्वर सदनिं जाउनी चिंता रहिताच बैसे ॥ - यथासांग तें पूजन करुनी भक्तीने प्रार्थितसे ॥ Pou, चिंता दूर करी ॥ त्रिपुरांतक हर मदनारी ॥ २ ॥ /// शिव पूजा ती बघण्यासाठी जन येती शिवसदनीं ॥... त्यांत एक ती गोप गृहिणी पाही पूजा नयनी ॥ संगें बाळ तिचा ॥ होता तो सहा वर्षांचा ॥ ३ ॥ बाळासह मग पूजा पाहुनी गोपी गृहास आली ॥ गृहकृत्य ते करण्या साठी मुलास उतरी खाली ॥ तव तो जाऊनी ॥ वैसे नजिकचि तृणसदनीं ॥ ४ ॥OALNE पद ( देव स्त्री मेनका ) या चाटीवर. लिंगाकृतिच्या पाषाणाते शिव लिंगाचे मानी ॥ मृत्तिकेचि ती करुनि वेदिका स्थापी त्या स्थानीं ॥धृ०॥ लघु पाषाणा पुष्पं समजुनि वाही लिंगाला ॥ धूप दीप नैवेद्य करी तो वाहनि दगडाला ॥ मंत्र ध्यान ते ठाउक नाहीं अज्ञाचे बाळाला ॥ परिमळ द्रव्ये समजान लावी धूळचि लिंगाला ॥ चाल । मानस पजा करि मग प्रेमानें ॥ शंकर हर हर ह्मणे मग वदनानें ॥ नाचे डोले तो आनंदानें ॥ चाल ॥ पुष्पांजुलि ती अर्पण केली धूळचि वाहूनी ॥ रायासमतें पूजन करूनी आणी शिव भ्यानीं ।। १॥ ... श्लोक.... इद्रवाना. माता करूनी स्वयपाक पाही ॥ बाहेर येऊनि मुलास बाही ॥ ये वा करी सत्वर भोजनाला ॥ नाहींच तो की परि शीघ्र आला ॥१॥