पान:संगीत शिवलीलामृत.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हंगीत शिवलीलासन. .. आर्या दिव्य हिरा परिस तसा मुक्ता फळ तें सुढाळ तेजस्वी ॥ ज्ञानी पिता गुरुचि तो अपूर्व हे त्रिभुवनांत सर्वस्वी ॥१॥ मगिभद्राने दिधला एक मणी आणनी नपाला हो ॥ भासे सूचि दुसरा तत्तेज न वर्णवचि मजला हो ॥ २ ॥ पद ( नाउ नकारे विषया, ) या चालीवर. अष्ट धातुला स्पर्श मण्याचा सुवर्ण ते होई ॥ व्याघ्र सर्पही चोर न राहती दुर्भिक्ष तें जाई ।। रोग सर्वही भस्माचे होती दरिद्री सुखि होई ॥ जेथे जेथे मणि तो जाई तेथें सुख होई ॥ १ ॥ . पद ( चाल सदर.) कंठि बांधितां राजा शोभे इंद्रची दुसरा ॥ समरांगणि तो विजयि होतसे अपेश ये इतरा ॥ ऐश्वर्यहि ते वाढु लागले त्यायोगें झरझरा ॥ महाकालेश्वर भजनीं रत तो मानीना इतरा ॥ १ ॥ पद ( गंगा नदि ती सागर सोडुान, ) या चालीवर. ऐश्वर्य ऐसें चढतचि गेले इतरा तें दुःसह झालें ॥ सारे राजे एक. होउनी माणि मागो आले ॥ अपार दळ ते संगें घेउनी युद्ध कराया मग गेले ॥ चंद्रमौळि सम मणि जो आहे मागति ते त्या वेळे ॥ पाहुनि ऐसा अनर्थ नपति तो काय मनी मग बोले ॥१॥ ( प्रतिकुल होईल कैसा ) या चालीवर. सुखकर हा मणिच झाला दुःखद की माते ॥ भूषण ज्या कारणे जे ते दूषण होतें ॥ ध्रु० ॥ अति रूप आति धन तैशी अति विद्या प्रीती ॥ आति भोग अति दुषण हे ही दुःखाच तें देतीं ॥ माण जरि देईन आतां क्षात्रपणाच जातें ॥॥