पान:संगीत शिवलीलामृत.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. पुनरपि सत्य फिरूनी घालित होतों प्रदक्षिणा सदना ॥ मागुते मजला पाहुनि बहु क्रोधानेच मारिती बाणा ॥ ४ ॥ शिव लिंग पुढे लक्षुनि सखये तेथे च सोडिला प्राण ॥ त्या पुण्ये कराने मला प्राप्त असें राज देह हा जाण ॥ ५ ॥ दुष्ट गुण श्वानाचें माझें आंगींच ते परी वसती ।। त्या योगें या जन्मी माझे हातून दोष हे घडती ॥ ६ ॥ मग ती रायास ह्मणे तह्मा जरि पूर्व ज्ञान ते आहे ॥ . तरि मजला सांगा हो मी पूर्व जन्मी कोण होते हैं ॥ ७ ॥ दिडी कपोती तूं होतीस पूर्व जन्मीं ॥ धरुनि मांसातें चाललीस धामीं ॥ श्येन पक्षी तो तुझ्या पाठि लागे । श्रमुनि शिखरी मग बैसलीस तूं गे ॥ १ प्रदक्षिणाहि शिखरास करुनि कांते ॥ श्रमनि बसलिस तो पक्षि येत तेथें ।। दुष्ट पक्षाने तुला मारिलें गे ॥ तुझें धड मग खालती येइ वेगें ॥२॥ दैव योगें शिव लिंग तिथे होतें ॥ देह तूझा सहजची पडे तेथें ॥ त्याच पुण्ये झालीस राणि तूं गे । शिव महिमा वर्गु मी किती सांगे ॥ ३॥ कमद्वतिने रायास प्रश्न केला ॥ त्रिकाळाचे जरि ज्ञान हे तमाला ॥ .. पुढिल जन्मीं कोणत्या कुळीं जाऊं ॥ तुली आझी जन्म तो कुठे घेऊं ॥ ४ ॥ साकी. सिंधु देशिचा नृप मी होइन जया नाम तें तुजला ॥ राजकुळी तूं जन्मा येउाने तेथे वराशल मजला ॥ तिसऱ्या त्या जन्मी ।। सौराष्ट्राधिप होइन मी ॥ १ ॥ कलिंग कन्या होउनि तूं गे मजला तेथे वरशी ॥ चौथ्याने मी गांधर नृप तूं मागध दुहिता होशी ॥ अवंति राजा मी ॥ होइन पांचवे जन्मीं ॥ २ ॥ दाशाह कन्या होउनि मजला वरशिल सखये पाही ॥ साहवे जन्मी अनर्त पति मी ययाति कन्या तू ही ॥ पांड्य राजा मी ॥ होइन सातवे जन्मीं ॥ ३ ॥