पान:संगीत शिवलीलामृत.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. पद ( जल भरन जात,) या चालीवर. ऐसें हिंडत हिंडत जातां ।। तिचि ती झाली दूरचि चिंता ॥ ५० ॥ धनिक सभाग्य शूद्र भेटला ॥ त्याने इजला केली कांता ॥ सर्वहि धन तें तिजला देउनी ॥ करि तो तिजवर फारचि ममता ॥ दास दासिते संगें घेउनी ॥ कृषिकर्मा तो गेला असतां ॥ मागे ती स्त्री क्षाधित होउनी ॥ घेउन चाले शस्त्रचि हातां ॥ मद्य सेवुनी धुंद होउनी ॥ गोवत्स कां बस्त न पाहतां ॥ गोवत्साचा कंठ छेदिला ॥ कोठुन येइल हृदयीं ममता ॥ डोळे उघडुनि पाहि पापिणी ॥ शंकित झाली वत्सा बघतां ॥ शिव शिव शिव शिव मुखीं ह्मणोनी ॥ करणी केली ह्मणे नकळतां ॥ व्याघ्राने ते वत्स मारिलें ॥ प्रगटचि केली ऐसी वार्ता ॥ १ ॥ साकी काही काळे मृत्यु पावली दूतांनी ती नेली ॥ कुंभीपाकी घालुनि तिजला असिपत्रीं हिंडविली ।। तप्त भूमि वरती ॥ तिजला मग ते लोळविती ॥१॥ दक्षिणपति तो पुसूं लागला चित्रगुप्तास मग तें ॥ कांही ईचे पुण्य अहे कां सांगा आतां मज तें ॥ तेव्हां ते ह्मणती ॥ थोडे पुण्य इचे खातीं ॥ २॥ शिव शिव नामा मुखी घेउनी गोवत्सकंठ चिरला ॥ यमधर्मानें चांडाळाची योनी दिधली तिजला ॥ गर्भाध ती झाली ॥ विष्टा मुत्रे सदां भरली ॥ ३ ॥ दिंडी जनक जननी सोडुनी तीस जाती ॥ फिरे मग ती घेउनी यष्टि हाती ॥ शिवदिन तो तरी बह जवळ आला ॥ ह्मणनि गोकर्णा जात भक्त मेळा ॥१॥ तया संगें चालली पापिणी हो ॥ भद्रकाळी देवळा जवळि ती हो ॥ पडुनि तेथे अन्न द्या असें बोले ॥ परी नाहीं तें तिला प्राप्त झालें ॥ २ ॥