पान:संगीत शिवलीलामृत.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय तिसरा. भक्त जे जे घालति प्रदक्षणेला ॥ हाक जेव्हां ऐकिती तये वेळा ॥ बिल्व दळ ते टाकिती तिच्या हातीं ॥ देइ फेकनी वरि वरी तरी ती ॥३॥ पद (प्रिये पहा रात्रीचा, ) या चालीवर. पाहि पाहि समय कसा सहज तिला तो प्राप्त जाहला ॥ धृ०॥ बिल्व दळ फेकुनि देत ॥ लिंगावरि सहज पडत ॥ शिव दिनि ती उपोषीत ॥ जागर घडे सहज तिला ॥ १ ॥ शिव नामें गर्जति जन ॥ तीहि करी शिव स्मरण । तीच ही चांडाळीण ॥ नेट निज पर्दी इला ॥ २ ॥ दिव्य देह तिचा होत ॥ शिवलीला मखीं गात ॥ बसविलि मग विमानांत । मिरवित मग नेति तिला ॥ ३ ॥ साकी. शिवरात्रीचे पर्व साधुनी गोकर्णा तूं जावें । परमेश्वर तो पजून तेथे मुक्त होउनी जावें ॥ सांगुनि राजाला ॥ जात माने जनक यागाला ॥ १ ॥ ऐसें ऐकुनि कल्माषपदही गोकर्णासी गेला ॥ प्रेम पुरस्सर भाक्त युक्तची पूजी मग लिंगाला ॥ होई सद्गद मनीं ॥ अश्रु वाहती ते नयनीं ॥ २ ॥ उमारमण तो तोष पावुनी राजा दर्शन दिधलें ॥ ब्रह्महत्यादि पातक सारे दग्धचि होउन गेलें ॥ विमान तें आलें ॥ शिवगण आंतचि ते बसले ॥ ३ ॥ अनंत वाद्ये वाजु लागलीं सुर गण वर्षतिं सुमनें ॥ दिव्य देह तो राजा पावनि गायी नामा शांतमनें ।। स्वर्गी पद सारी ॥ मिरवित नेला त्यास तरी ॥ ४ ॥ सरूपता ती मुक्ति मिळूनी शिवरूपी तो झाला ॥ धन्य गोकर्ण धन्यचि व्रत तें धन्य जन भजति गाला ॥ धन्य मुनी झाला ॥ धन्य तुमि श्रवणी बसला ॥ ५ ॥