पान:संगीत शिवलीलामृत.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृन. अवश्य ह्मणुनी विप्रा हाती आःम लिंग तें दिधलें ॥ लघुशंका 'मग करण्यासाठी दर गमनची केलें ॥ अघटित हो झालें । गजाननाने तें केलें ॥ ५ ॥ पद. (भोमक बाळा ह्मणे न पाळा ) या चालीवर. इंदिरावरचि अवतरलासे गजाननाचे रूपाने । शिवोपासना कांहि घडावी मजला तरि या हाताने ॥ ४० ।। त्याने मोठे नवलचि केलें मत्र रावणा बहु आलें ॥ पाखांड्याचे कुमत सरेना उपदेश जरी बह केले ।। काही केल्या मूत्र सरेना वरिवरि तरि तो पुर चाले ।। इभवक तया हाक मारुनी घे लिंग हे असें बोले ।। हातांनी तो खूण करूनी रावण त्याते थांव ह्मणें ।। दूसरी तिसरी घटका झाली हाक मारितो मोठ्याने ।। इंदिरावर ।। १ ।। सांभाळी हे लिंग रावणा ठेवि मग तो अमंडळी ।। अक्षय स्थापित असेच झालें स्तविला देवी त्या वेळी । गाईसह तो गुप्त जाहला रावण धांवत ये जवळी ।। क्रोधभरें तो उपडूं पाहे लिंग हलेना स्थीर स्थळी ।। डळमळु लागे कुंभिनि तेव्हां उपडेना तें लिंग मुळी ॥ धांवत धांवत रावण गेला गाईचा तो कर्ण पिळी । तोहि तयाला नाहिं उपडला लिंग पुजी मग त्याच स्थळी ॥ तेच गोकण महाबळेश्वर गजो हर हर मोठ्यानें ।। इंदिरावर ॥ २ ॥ पद. (नाहि झाले षण्माप्त मला ) या चालीवर. पूजी लिंगा नित्य तिथे कैकसोच ती ।। रावण कुंभकर्ण बिभीषणादि पूजिती ॥ ५० ॥ त्याच बळेंहि रावणाने देव जिंकिले ॥ मंदोदरी ऐसें रत्न प्राप्त जाहलें ॥ लक्ष पुत्र लक्ष पौत्र त्यास लाभले ॥ शिव महिमा वर्णितां । सुरासुरहि भागले ॥ महिमा सांगु किती ॥ पूजी लिंगा निय० ॥ १ ॥ साकी मिथिलेश्वरास यागा साठी आली जातचि असतां ॥ .

  • अपूर्व नवल जं द्वाष्टेस पडले तुला सांगतों आतां ॥

करुनी शांत मना ।। भक्तीने दें तूं श्रवणा ॥ १ ॥