पान:संगीत शिवलीलामृत.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. पद ( चाल सदर.) कैकसि नामें रावण माता लिंगार्चन हो करी || व्हावी शिवकृपा पत्रा वरी ॥ धृ०॥ पांच धान्ये पिष्ट करूनी लिंग तिने करविलें ॥ इंद्रे फेकुन ते हो दिले ॥ रावण माता अन्न न घेई कष्टी पाहनि तिला ।। रावण कैलासा करे चालला ॥ आत्मलिंग ते आणण्यासाठी गेला तो गिरि वरी ॥ जाऊनी गहन तपाते करी ॥ चाल ॥ दशाननाने मग गायन आरंभिलें ।। स्वहस्तेंचि त्याने शिर अपले कापिलें ।। स्वशिराच्या त्याने ताती करुन गायिलें ॥ चाल राग उपराग भार्या सहितचि गायन तें तो करी ॥ तोषला शंभ मग अंतरी ॥ १ ॥ प्रसन्न झालों तुला रावणा अपेक्षित जे मनीं ॥ माग तें देतों तुज लागुनी ॥ आत्म लिंग ते देउनि मजला त्रिभुवनी रूपवती ॥ ऐशी ललना दे मज प्रती ॥ कोटि सूर्यही कमीच तेजें ऐसें लिंग काढिलें ॥ शंकरें रावणा प्रति ते दिले ।। लिंग काढिलें तेज फाकलें दिशा मंडळांतरीं ॥ ज्याचे श्री विष्णू ध्यानचि करी ॥ ब्रह्मादिकांहीं अगम्य जाणा मुनिजन जें सेविती ॥ ज्याकरितां वेद शास्त्र भांडती ।। चाल ॥ तें लिंग रावणे हाती मग घेऊनी । त्रिलोचना प्रति तो बोले मग प्रार्थनी ॥ पार्वतिचिच प्रतिमा दे स्त्री मज लागनी ॥ चाल ॥ हिची प्रतिमा निर्म शकेना ब्रह्मदेव ही करी। घेउन जा हीच मग तूं तरी ॥२॥ अवश्य ह्मणुनी स्कार्दै घेतली स्कंदजननी तरी ॥ चाले घेउनि लिंगचि करीं । दक्षिण पंथें सत्वर जातां भ्याले सुर अंतरीं ॥ ह्मणती किति भोळा देव तरी ॥ गजानन स्कंद विरभद्र ही नंदी- सह तळमळती ॥ कैसे उदारपण हे ह्मणती ॥ पंचवदन तो हंसन बोले धांवेल लक्ष्मीपती ।। तियेचा कैवारी तो वदती ॥ चाल । इकडे भवानी स्तवित इंदिरावरा ।। वारिजनयना तूं धांव धांव श्रीधरा ॥ हे स्तवन ऐ- कुनी धांवें तो सत्वरा ॥ चाल ॥ विप्ररुपाने अडवा येउनी बोले मग ता तरी ॥ कोठे ही स्त्री मिळविली परी ॥ १ ॥ पद. ( शिवाज्ञेचि वाट न पाहतां.) या चालीवर. रावण वोले सदाशिवानें अपर्णा ही दिली ॥