पान:संगीत शिवलीलामृत.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय तिसरा. साकी. गोकर्णाला जाउनि तूरे पूजी त्रिंबक राजा ॥ परम पूत तें भूकैलासचि मुक्तचि होशिल राजा ॥ महिमा मी वदतों ॥ जो सकल पापची हरितो ॥ १ ॥ (भला जन्म हा,) या चालीवर कैलास पती भोला शंकर ओंकार रूपी दिसे ॥ भवानी सहितचि तेथें वसे ।। ध्रु० ॥ अर्ध मात्र जें पीठचि भासें सरासर हि सेविती ॥ कोटि सूर्य तेजें कमि भासती ॥ ब्रह्मादिकांही दुर्लभ जाणा शिव दर्शन तें तरी ॥ जनार्दन तेथे तप ही करी ॥ वशिष्ट भग तो जमदग्नीही इतरहि सगळे त्ररुषी ।। वसती तेथे ते अहर्निशीं ॥ चाल ॥ मंडानी सहित तो शंकर तेथें वसे !। कैवल्य गाभिंचा पूर्णचि गाभा दिसे ॥ सनकसनंदन नित्यचि तेथे वसे || चाल | पाषाण तरू तेथिल सारे दुसरे कोणी नसे । निर्जराचि ते अवतरले असे ॥ १ ॥ मडानिनायक पाहण्यासाठी मंडप घसणि होतसे ॥ नारद तो शिवलीला गातसे ॥ गोकर्णाचे चोहुं बाजूला सारे देवाच उभे ।। आनंदित पाहनि त्या शिवप्रभ ।। वेदघोष ते ऋषिजन करिती नत्य करुनि नायिका ॥ तोषवितो त्या गौरिनायका ॥ पूर्व दक्षिण पश्चिम उत्तर या दिशेस तिष्टति ॥ इंद्र यम वरुण वैश्रवण राखिती ॥ चाल | घवघदित तेज तें पसरे चहुं बाजुला ॥ भवानी सहित तो शंकर मधिं बैसला । कर्पर गौर तो ध्यानी आणि चांगला ।। चाल ॥ त्या भोवते महासिद्धिचे पूजन तें की असें । मागुती कात्यायनि करितसें ॥ २ द्वादश मित्रहि अकरा रुद्र ते पूजिति जान्हविधरा ॥ अष्टवस दिग्पाल जोडिति करा ॥ वरकड क्षेत्री लक्ष वर्षे हि तपाचरिले जरी ॥ एक दिनीं पुण्यचि तेथें तरी ॥ प्रदोषकाळी शिव- वासरी समुद्र स्नान जो करी ॥ त्यापाशी सगळी तीर्थं तरी ।। चाल ॥ नि- वाण लिंग तें दशानने आणिलें ॥ उग्र तप पाहुनी शंकरें त्या दोधलें ॥ गजाननाने तें गोकर्णी स्थापिलें । चाल || सूतांनी जी ऋषीजनांला कथा कथिली असे ॥ तीच मी तज प्रति सांगत असे ।। १ ।।