पान:संगीत शिवलीलामृत.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. गृहारण्य तें समान त्याला ॥ मगया करग्या राव निघाला ॥ परि ब्रह्महत्या न सोडी त्याला ॥ उभी सदां पाठीशी ॥ ३ ॥ जिकडे जिकडे राजा जाई ।। तिकडे तिकडे हत्या येई ।। जागृति स्वप्नीं सर्व काळही ॥ त्याच्या दृष्टि पुढे ॥ ४ ॥ राजा हिंडे तीर्थे सगळी ॥ व्रतेंहि बरवीं बहुतचि केली ॥ . परि हया ती मागे लागली ॥ कदापी न सुटे ॥ ५ ॥ साकी. ऐसा हिंडत हिंडत राजा मिथिला नगरा आला ।। वन शोभा ती नयनी पाहुनि आनंदित तो झाला || परी ब्रह्महत्या ती ॥ राया पाठी उभि होती ॥ १ ॥ पद, (चाल साधी.) आम्र पोफळी राजन ते खर्जुरि केळि नारळी ॥ वट पिंपळ ते औदुंबर ही कपित्थ बिल्व ती बकुळी ।। जाइ जुई मोगरा मोतिया गुलाब ही फुले फुलली ॥ याया परिने वन श्रीला फारचि शोभा आली ॥ १ ॥ दिंडी. क्षधित प्राण्या क्षीराब्धि प्राप्त जैसा ॥ अमृताचा लाभ की मृता जैसा ॥ दरिद्याला सांपडे मणी जैसा ॥ मुनी गौतम पातला तिथे तैसा ॥ घालि लोटांगण मुनीच्याच पायीं ॥ अष्ट भावें सद्गादत राव होई ॥ करद्वय तें जोडुनी उभा राहे ॥ अश्रुजळ ते नयनींच फार वाहे ॥२॥ कुशल अससी की ? नृपा ! मुनी बोले ॥ स्वधर्माने की प्रजा तुझी चाले ॥ कुशल असती सर्व ही मुनी राया ।। कथन करि मग पुर्विचे कर्म राया ॥३॥