पान:संगीत शिवलीलामृत.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय तिसरा. श्लोक. (द्रुतविलंबित.) ढळढळा नयनीं जळ वाहते ॥ वरि वरी पातेला सति बाहते ।। प्रियसख्या काश हो गति जाहली ॥ शिव शिवा ह्मणुनी उडि टाकिली ॥१॥ साकी. द्वादश वर्षे मुक्त होउनी राजा नगरी आला ॥ सतिने त्याला शाप दिला जो सांगी मदयंतीला ॥ सांगाने तो बोले ॥ जन्मा सार्थक नच झालें ॥ १ ॥ पद. (अक्रुर हा नेतो श्रीकृष्णाला,) या चालीवर, हर हर शंभो काय गती ही अमची ॥ खुंटली वाढ वंशाची ॥ धृ०॥ अहो पति राया अवरुनि इच्छा मनिची ।। रक्षा तरी, तनू तुमची ॥ आज पासुन ती खदिरांगाराची ॥ शेजचि आपणा साची ॥ चाल ॥ आतां धरुनी ब्रह्मचर्याला ॥ मनिं नका आण परस्त्रीला ॥ चाल ॥ जसि गति होई दंत हीन भुजगाची ॥ तसि हो गती ही तुमची ॥ हर हर ॥१॥ दिंडी. पुढें कैसा चालेल वंश आतां ॥ हीच चिंता लागली नपा नाथा ॥ शास्त्र शासन पाहुनी वाशष्टानें ॥ मदयंतिला भोगतो दिला त्याने ॥१॥ अंजनीगीत. तेणे करुनी गर्भ राहिला ॥ मदयंतीला पुत्र जाहला ॥ तेणे करुनी वंश चालला ॥ मोठे नवलचि हे ॥ १ ॥ काम गजाला अवरुन धरला ॥ विवेकांकुशे मारुनि त्याला ॥ आण नयें तें वैधव्य स्त्रीला | विचार राव करी ॥ २॥