पान:संगीत शिवलीलामृत.pdf/३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२४ . संगीत शिवलीलामृत. आइ राप तूं मी ताझे लहान ॥ ठेविलि तुझिया मांडी मानें ॥ माझ्या बोला देउाने कान ॥ चुडे दान दे मजला ॥ पडते ॥ १ ॥ श्लोक ( मालिनी.) गडबड मग लोळे राक्षसाचेच पायीं ॥ पसरुाने पदराती दीन वाणीच गायीं ॥ झडकरि पाते माझा सोडुनी देइ राया ॥ पुनरपि सात लागे राक्षसांच्याच पायां ॥ १ ॥ साकी दुष्ठ राक्षसा माया कैसी सतिच्या वचनें येई ॥ तिच्या पतीला भक्षण करुनी अस्ती टांकुन देई ।। पाहुनि करणी ती ॥ शोके विव्हळ बहु होती ।। १ ॥ दिंडी. शोक करिती फारची दीनवाणी ॥ शांत करण्या तीस हो नसे कोणी ॥ शाप दिधला मग तिने राक्षसाला ॥अलोटचि जो भासला हरिहराला ॥ १ ॥ साकी. मदयंतींचा संग करिसे जरि मरणाच येइल तुजला ॥ कोण्या स्त्रीचा संग तुलारे नमिळो तुज चांडाळा ॥ केल्या कर्माचें ॥ भोगीरे फळ तूं साचें ॥ १ ॥ श्लोक. इंद्रवजा. काष्टें जमा ही करुनीच त्याते ॥ लावून अग्नी आपुल्याच हातें ॥ अस्थी पतीच्या जमवी सतीहो ॥ घेऊन हाती उभि राहिली हो ॥१॥