पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२२ संगीत शिवलीलामृत. मगया करुनी नगरा आला राजा सेने साहित ॥ असुर धरूनी मानव वेषहि आला राज सभेत ॥ स्कंधी दर्वीती ॥ पाहाने कोण असे पुसती ॥ २ ॥ सप शास्त्रिं मी निपुणचि आहे करिन सुवासिक अन्न ॥ देवादिकही चाखुनि राजा ह्मणती मजला धन्य ॥ राजा ऐकूनी ॥ ठेवी तया पाक सदनीं ॥ ३ ॥ . दिंडी पितृतिथि ती लक्षनी भभुजानें ॥ अमंत्रण तें दीधलें अनंदानें ॥ वशिष्टासी आगि हो भोजनासी ॥ पुढे होणारे काय केळे त्यासी ॥ १॥ सूड घेण्याची वेळ बरी आहे ॥ दुष्ट राक्षस तो कपट युक्ति पाहे ॥ . भाजि मध्ये नरमांस अणुनि घाली ॥ वशिष्ठाला वाढिली तये वेळों ॥ २ ॥ भाजि मध्ये नरमांस पाहुनीया ॥ शापि मुनि तो राजास कोपुनीया ॥ होइ राक्षस नामळो अहाराते ॥ राव बोलें ठाउके नसें माते ॥ ३ ॥ सूप शास्त्री त्वरितची अणा येथें ॥ पाहति परितो न मिळे त्यास तेथें ॥ दोषि नसतां कां मशी शापिले हो ॥मीहि शापिन तो शाप आतां ध्याहो ॥४॥ साकी ऐसे बोलुनि नृपोत्तमाने उदक घेतले हाती ॥ शाप द्यावया सिद्ध जाहला तो आली मदयंती ॥ त्याची कांता ती ॥ फार गुणवती होती ॥ १ ॥ अंजनी गीत प्राणसखया अपणा स्तवितें ॥ शाप कुणाला देतां तरिते ॥ वशिट मुनि हा गुरु अपणाते ॥ विचार तरि कांहीं ॥ १ ॥ गुरुसि शाापेतां जाइल राया ॥ नरकामध्ये तुझि ही काया ॥ रागाने हो जाइल वाया ॥ विचार करि कांहीं ॥ २ ॥