पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय तिसरा. अध्याय ३ रा. कामदा ( या चारविर.) पार्वतीवरा त्रिपुरनाशका ॥ अष्टमूर्ति तूं मदनदाहका ।। भाललोचना धूर्जटी हरा ।। स्थाणु रुद्र तूं गौरी शंकरा ।। शंभु शंकरा हे महेश्वरा ॥ वामदेव तूं जान्हवीधरा ।। स्कंदतात तूं नागभूषणा ।। चंद्रशेखरा तूं त्रिलोचना ॥ १ ॥ साको यथा मतीने शिवरात्रीचा माहेमा वर्णन केला ॥ गोकर्णाचा माहेमा आतां कथन करिन तुह्माला ॥ द्याहो श्रवणाला ॥ कारील दग्ध जो पापाला ॥ १ ॥ आर्या इक्ष्वाकूच्या वंशी मित्रसह नामेंच भूप तो धन्य ॥ वेदशास्त्र तो जाणे होता पाडत जनांत बहु मान्य ॥ १ ॥ शुरहि मोठा होता पृथ्वी सारीच जिंकुनी टाकी ।। नामेती सारे राजे शोभे तो इंद्र साच भूलोकीं ॥ २ ॥ तो एकदां वनाला संगें घेऊन सर्व सेनेला ॥ गेला घोर वनांतरि इच्छी मनि की यथेच्छ मृगयेला ॥ ३ ॥ व्याघ्र वृक सिंह मग गज वानर चातकादि वाधेले हो ॥ मारी नृप जीव बहू सहज वधी त्यांत एक राक्षस हो ॥ ४ ॥ साको मम बंधुला न मारिलें कांही दोषचि नसतां ॥ त्याचा बंध खराच जार मी घेइन सूडाचे आतां ॥ ऐसें बोलूनी ॥ निधे कपटची योनी ॥ १ ॥