पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१४ संगीत शिवलीलामृत. श्रीधरस्वामी यांची गुरु परंपरा आणि आख्यायिका. अंजनीगीत. श्रीधर स्वामी ब्रह्मानंदचि ॥ ते तरि आनंद सांप्रदायची ।। क्षीरसागरीं तो गोविंदची ॥ विधिला उपदेशी ॥ १ ॥ साकी. अत्रिऋषीते तेथुन पुढती दत्तात्रय महाराज ॥ तया पासुनी सदानंद ते रामानंद यतिराज ॥ अमलानंद तरी ॥ ब्रह्मानंदचि ते त्यावरी ॥ १ ॥ कल्याणामधिं राहणार जे सहजानंदचि स्वामी ॥ पूर्णानंद मग त्यावर झाले दत्तानंदाचि स्वामी ॥ ब्रह्मानंद पुढती ॥ तेच मला उपदेशिती ॥ २ ॥ पद. ( भला जन्म हा तुला लाधला, ) या चालीवर. पंढरीहून चार योजनें नैऋत्य कोणावरी ॥ आहे नाझरे ग्रामचि तरी ॥ ५० ॥ त्याग्रामीचे पूर्वज माझें देश लेखक तरी ।। रोज लिहिणे लिहिती करीं ॥ पूर्वाश्रमि मी ब्रह्मानंदाच आलों मग पंढरौं । आश्रम केला मग तो दुरी ॥ चतुर्थाश्रम घेउनि केली अक्षय वस्ति पंढरीं ॥ समाधी घेउनि तेथे तरी ॥ ब्रह्मानंद तो मम जनकची सावित्रि माता खरी ॥ वंदाया भक्त येती पंढरी ॥ वंदानि दोघा शिवलीलामृत पूर्णचि केले तरी ॥ आर्पिले नेउन चरणावरी ॥... शकें सोळासे चाळीस साली विलंबी संवत्सरौं । फाल्गुण पौर्णिमा रविवासरी ॥