पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय चौदावा. २१३ अंजनोगीत. में जें संकट ये तुझातें ॥ निवारील हो शंभू तें तें ॥ .. ह्मणुनि स्मराहो शिवनामातें ॥ संकट मग कैचें ॥१॥ पद, . (दो दिवसाची तनु ही साची, ) या चालीवर. मंगलाचरण प्रथमा ध्यायीं गावुनि केली शंभुस्तुती ॥ दाशार्हराया उद्धरिला हो धन्य तरी ती कलावती ॥ , द्वितियाध्यायीं शिवरात्रीची कथा सर्वही वदली ती ॥ तिसऱ्यामध्ये गौतम सांगी गोकर्ण महिमा शुद्ध रिती ॥ कल्माषपाद उद्धरिला हो झाली हत्या दूरचि ती ॥ चवथ्यामध्ये बाळाला तो प्रसन्न झाला पशूपती ॥ पांचव्यांत हो शिवाज्ञेनें उमा पाळि हो अर्भक ती॥ साहव्यांत हो सिमंतिनीची कथा साग्र ही वदली ती ॥ सात आठ माधं भद्रायूचे कथनाच केलें यथामती ॥ नवमोध्यायी वामदेव तो फिरताच असतां भूवरती ॥ त्याचे संगें दुर्जय तरला जन्म दुःख हो कथिली ती ।। दाह यामाधं शारदस तो पुत्र दिला त्वां बहु सुमती ।। आकराव्यामधिं रुद्राक्षाची कथा फार हो सुरसचि ती ॥ महानंदा उद्धरिली हो भद्रसेन तो जात गती ॥ बाराव्यामाधं बहुला तरली भस्मासुर तो दुष्टमती ॥ मोहिनीरूपें विष्णू मारी दुष्टालाही दिली गती ॥ तेराव्यामधिं शंकरास हो वारती झाली पार्वति ती ॥ चौदामध्ये शंकरपार्वति विनोद करिती बहुत रिती ॥ शंकरास हो भुलवुन आणी होउनि पार्वति भिालण ती ॥ श्रियाळ चरित्र अगाध कथिले संपूर्णचि हे याच रिती ॥१॥ -