पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२२०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२१२ संगीत शिवलीलामृत.. शंकर शंकर ह्मणती वदनीं ॥ दोघे ही सर्वदां ॥ १ ॥ कांती नगरी तोष जनांना ॥ होइल तैसा सकळ त्रिभुवना ॥ शिवनामाची करति गर्जना ॥ श्रीधर स्वामी ते ॥ २ ॥ अभंग. चौदा अध्याय संपूर्ण जाहले ॥ कळसा हो आले निरूपण ॥ चौदा विद्याचे हे सार तरी जाणा ॥ न करखे गणना कोणालाही ।। चौदा गाठिचा हा अनंत परिकर ॥ भजा निरंतर मनोभावें ॥ गयावर्धन हे चौदा पद झालें ॥ पुण्य तें घडलें अपारची ॥ चौदा रत्नांचा हा प्रकाश पडला || चौदा ही लोकाला प्रिय झाला ॥ चौदा कांडे वेद की चौदा कोहळी ॥ द्रव्य भरलेली मिळाली हो ॥ चौदा ह्या कोठड्या शुद्ध तरी फार ॥ निर्मिले मंदीर शिवाचें हो ॥१॥ आर्या. श्रवण पठण लेखनही, अनुमोदन निदिध्यास तो जाणा ॥ रक्षण ग्रंथाच करितां, फळ समान ते असेंचि सर्वांना ॥१॥ इतुक्यासहि शंकर तो, अंगाची साउली करी पाही ॥ आयुरारोग्य वादनि, ऐश्वर्याच प्राप्त होय त्यांना ही ॥ २ ॥ व्याधी निरसुनि जाई, वंधेला पुत्र तो तरी होई ॥ बहु दिन ग्रामी गेला, भेटाया पुत्र तो तरी येई ॥ ३ ॥ संपत्ती बहु दाटे, ऋणमोचन होय तें तरि त्वरित । शत्रुक्षय यथार्थचि, दक्षिण मुखि वाचितांच तो होत ॥ ४ ॥ शतावर्तनें करितां, पोटी शिवभक्त सूत तो होई ॥ त्रिमासावर्तनही, संकट निरसोन दूर तें जाई ॥ ५ ॥ ज्या गृहिं ग्रंथचि राही, पिशाच भूत न रिघेच हो तेथें ॥ भावें प्रचीत पहावी, अभाविका काय हो तरी येथें ॥ ६ ॥ दिंडी सोमवारी ग्रंथ हा पूजुनिया ॥ प्रदोष कालिं शिवरात्र लक्षुनीया ॥ .. शुचिर्भुतपणि जर तुलां नीज लागे । स्वप्निं प्रगटुनि सर्वही शंभु सांगे ॥ १ ॥