पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२१९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय चौदावा. में प्रिय असेल तुझे मानसीं माग चांगुणे मजला ॥ प्रसन्न झालों इच्छित देइन सर्वचि तें तरि तुजला ॥ त्यावर ती बोले । अतिताला हो त्या वेळें ॥ ३ ॥ अंजनीगीत. मला निपुत्रिक ह्मणतिल आतां ॥ धुवोनि काढी कलंक ताता ॥ शरण असें मी तुजला अतिता ॥ हेंचि मागणे माझें ॥ १ ॥ मम वचन तें सत्य मानुनी ॥ दीर्घ स्वराने हाक मारुनी ।। घाही पुत्रा संशय सोडुनी ॥ येइल तो धांयुनी ॥ २ ॥ दिंडी. सय मानुनी अतितवचन तें हो ॥ दीर्घ हाका फोडिते चांगुणाहो ॥ लणे चिलया येइ बा धावुनीया ॥ अतित खोळंबे ग्रास मुखीं ध्याया ॥ . नको राहूं खेळग्या गुंतुनीया ॥ सत्व राखी सत्वरीं येउनीया । जाउं पाहति तुजविणे प्राण बाळा ॥ दश दिशा ती पाहि हो तये वेळां ॥ सूर्य उगवे हो नभोंगणों जैसा ॥ धांवुनीया बाळ तो येत तैसा ।। श्रियाळाला प्रेम ते फार येई ॥ अतित तरि तो शिवरूप तयों घेई ।। १ ।। साको चिलयाला मग हृदयीं धरुनी बसवी अंकावरती ॥ श्रियाळ चांगणा लागति पायीं वर वर लोळण घेती ॥ शिव शिव शंभोरे ॥ आतां निज पद दावीरे ॥ १ ॥ दंदाभिनादें अंबर भरलें सुमन वृष्टि सुर करिती ॥ आनंदित तें नगर जाहले पहावया जन येतो ॥ जयजयकार करिती ॥ शिव शिव हर हर ते वदती ॥ २ चिलयासी मग राज्यि स्थापुनी छत्र तयावरि धरती ॥

  • शिवकृपेनें श्रियाळ चांगुणा दिव्य रूप हो होती ॥

सचिवाला ह्मणती ॥ आतां राज्य करा पुढती ॥ ३ ॥ , अंजनीगोत यानी भग हो त्यास बसवुनी ॥ स्थापी दोघा निज पदि नेउनी ॥