पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. दिंडी. दीप नसतां सदन तें शून्य जैसें ॥ घ्राण नसतां वदन ते दिसें जैसें॥ फळा वांचुनि वृक्ष तो शून्य जैसा ॥ तारकाविण तो नयन दिसे जैसा ॥ १ ॥ साकी निपुत्रिक तरी तैसे समजे पापी ते हो प्राणी ॥ अन्न कोण हो घेइल तेथें क्षणभरि तरि बैसोनी ॥ तेवी सदनाचे हें ॥ पुत्राविण शून्यचि पाहे ॥ १ ॥ सद्गद होउनि दोघे वदती एक सत जो होता ॥ तो चरणीं या अर्पण केला अंत किती हो बघतां ॥ .. अतीत जाइल हो ॥ सत्व कसें मग राहिल हो ॥ २ ॥ पद. (किती सांगु तुला, ) या चालीवर. एक बाळ तो, मज तो न दिसे ॥ धृ०॥ दया कसी बा तुज येत नसे ॥ महाराजा सत्व जातसे ॥ नयनांतुनिया पूर येतसे ॥ बाळक जाउनी सत्व जातसे ॥ चाल ॥ हा हा शंकरा ॥ धांव उमावरा ॥ करुनि त्वरा ॥ दीन मी असे ॥१॥ अंजनोगीत. वंशा खंडन कैसें झालें ॥ शंभु शंकरा कैसें केलें ॥ पुत्रसुखाला मी अंतरलें ॥ काय करूं आतां ॥ १ ॥ ऐसें ऐकुनि अतीत लोचन श्रवो लागले भारी ॥ .. वर्तमान तें बाहिर फुटले वळसा झाला नगरीं ॥ लोक दुःख करिती ॥ नृप किशोर दावा ह्मणती ॥१॥ सुरवर सारे ह्मणूं लागले बैसुनि तेव्हां यानीं ॥ सत्वधीर ही पतिव्रता हो धन्य चांगुणा राणी ॥ शंकर काय तिला ॥ नकळे देइल आमांला ॥ २ ॥