पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय चौदावा. तझी माउली ह्मणतां लाजचि ये गुणवंता ॥ केलिस तरि तूं सार्थकता ॥ गेलासी तूं त्या शिवपदि अविनाशी ॥ उद्धरून ने तरि मजशी ॥ १॥ ...... अंजनीगीत. त्रिभुवन सारे जरी शोधिलें ॥ तुजसम बाळक कधी ना मिळें ॥... बाळाचे ते तुकडे केलें ॥ म्यां पापिणीनें ॥१॥ पचवुनि आणिलें उठा सत्वरीं ॥ भोजन आतां करा झडकरी ।। - झाले श्रम हो आपणा भारी ॥ दया करा मजवरी ॥ २ ॥ - दिंडी. श्रियाळा तूं यजमान ह्मणुनि येई ॥ पंक्तिलाभचि तो मला तरी देई ॥ असें ऐकुनि संकोच तया झाला ॥ चांगुणा ती बोलली श्रियाळाला ।। १ ।। पद.. ( देव योग दुर्विपाक, ) या चालीवर. नऊमास गर्भ याच उदरिं वाहिला ॥ चार प्रहर काय तुझा भार जाहला ॥ धृ०॥ सत्व तरी राखि आतां अतित कोपला ॥ - चिंता ती काय बसा तुमि पंक्तिला ॥ पाहि पाहि अतित तरी निघुनि चालला । स्वसुत पोर्टि घालण्यास काय शंकला ॥ १॥ . साकी.. . नपती बैसे पंक्तीला मग ताटें वादुनि आणली ॥ चांगूणेसी अतित बोलला बाई बैसे खालीं ॥ तूंही पंक्तीला ॥ वैसे, पाहुनि समयाला ॥ १ ॥ त्यावरि बोले अतित तो तरी ऐकुनि दचके अबला || तुमचे मंदिार अन्न न घ्यावें ऐसें वाटें मजला ॥ ऐका कारण तें ॥ सांगिन तुझा सर्वातें ॥ २ ॥