पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. मंगळदायक-गीत तूं तरी ॥ गीत गायि गे रसिक सुंदरी ॥ खंती करतां तो मदनारी ॥ दुरावेल जाण गे ॥ ३ ॥ सद्भाव सरविलासनी ती ॥ कोमलहृदया नपकांता ती ॥ किंवा निश्चळ गंगानदि ती ॥ जाय मयांदा धरुनी ॥४॥ तिचे पाहतां मुख कमळाला ॥ रोहिणिरमण काळवंडला ॥ . उपमा द्याया तिचं रुपाला ॥ दुसरें न दिसें तें ॥५॥ पद. ( नकळे होइल गति कैशी, ) या चालीवर. येउनि उदरां तूं माझ्या ॥ धन्य तुवां केलें ॥ धृ०॥ माझे बाळक बहु सुकुमार ॥ किशोरपण परी बहु उदार ॥ हास्य वदन तें तुझे फार ॥ बहु उदारपण केलें ॥ येउनि० ॥१॥ दिसे बहु तुझे कोमल अंग ॥ निष्ठुर मी रे किति तरि सांग ॥ माझ्या पापा नाहीं थांग ॥ तूं तरि सांग जे केलें ॥ येउनि० ॥ २ ॥ परदेशी मी तुजविण बाळ ॥ माझे हस्तचि झाले काळ ॥ दुबळी झाल्ये होतिल हाल ॥ मम कर व्याल तुज झाले ॥येउनि०॥३॥ स्तनी पान्हा फुटला फार ॥ भूलिंगासी लागे धार ॥ धांवें धांवें मम सुकुमार ॥ दुग्ध फार रे आलें ॥ येउनि० ॥ ४ ॥ अतीत-जेउनि जब की जाय ॥ त्यागिन मी तरि माझी काय ॥ धीर नसे हो होत्ये हाय ॥ करूं काय या वेळें ॥ येउनि० ॥ ५ ॥ पद. ( आजि शेवटचा, ) या चालीवर. - सखया बाळा टाकुनि मजला जाशी ॥ लक्षुनि कैलासाशीं ॥ धृ०॥ सखया बाळा उभा राहि क्षणभररे ॥ तुज संगें मी येइनरे ॥ मोक्षाचें तूं केणे भरुनी जाशी ॥ कां तरि मजला त्यजिशी ॥ उदकाविण ती मासोळी हो जैशी ॥ तळमळते तुजविण मी तैशी ॥ मम हृदय कैसें झालें निर्दय कठिण ॥ कविं दावं जान हे वदन ॥