पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय चौदावा. बाळपणे मी पुढती येइन तुझेच उदराला ॥ मायाजाळ ही सर्व तिणे तो दूर किंहो केला ॥ वज्राहनिही कठिणचि केलें मन त्या समयाला ॥ चिलयाचें तें शीर छेदिलें सोडुनि ममतेला ॥ पुत्र नसे हो ह्मणुनी ठेवी त्या शिरकमळाला ॥ शरिराचा तो पाक करूनी उठवी अतिताला ॥ चाल ॥ सर्व साक्षि जो शंकर तो त्याला ॥ कळले की शिर ठेवि पाहण्याला ॥ मनी जाणे तो सर्वचि जगताला ॥ चाल ॥ उठुन चालिला झडकार तेव्हां दावुनि कोपाला ॥ श्रियाळ चांगुणा धावत जाती धरती चरणाला ॥१॥ साकी गात्रामध्ये प्रमुख असें जें शीर कुठे ते आहे ॥ वंचुनि कैसें तुवां ठेविलें आणी ते लवलाहे ॥ लागति ती चरणीं ॥ ह्मणती घालूं पचवोनी ॥१॥ न धरावा हो क्षोभ अंतरी नेणतपणिं जें चकलें ॥ सर्वाज्ञा तूं क्षमा करी रे अपराधचि जे केले ॥ आह्मी दास तुझे ॥ आतां क्षमा तरी करिजे ॥ २ ॥ दिंडी. शीर येई बाहेर घेउनीया ॥ घााले उखळी करि चूर्ण कांडुनीया ॥ कष्टि होऊाने अश्रु का नयानं येती ॥ पुत्र गेला सत्वास हानि हो ती ॥१॥ . अंजनोगीत. . अवश्य ह्मणुनी नृपतीललना ॥ शीर आणुनि करी कंडणा ॥ सत्व पाहि तो कैलास राणा ॥ सद्गद होऊनी ॥१॥ निज सत्वाचे उखळ करोनी ॥ धैर्य मुसळ तें करी घेउनी ॥ वेल्हाळी ती कांडी बैसुनी ॥ निर्धार अचळ धरूनी ॥२॥