पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०६ संगीत शिवलीलामृत. भक्षण करितां तुह्मांलाहो अन्नसत्र मग नाहीं ॥ रडतिल याचक ते ॥ कोण तरी त्राता त्याते ॥ १ ॥ एकुलता जो प्रियकर तुमचा पांचचि वर्षे ज्याला ॥ बत्तिस लक्षणि चिलया बालक भोजनास दे मजला । दूर करुनि माया ॥ ह्मणती जावें घेउनियां ॥ २ ॥ दिंडी व्याघ्र वृक वा रीस मी काहिं नाहीं ॥ मांस कैसें भर्धा मी तरी पाही ॥ उबग तुह्मी मनिं नका आणुं कांहीं ॥ घालि पचवोनी मांस मला तें ही ॥१॥ मोह ममता कां धरुन रुदन केलें ॥ सत्व घेउनि जाईन याच वेळें ॥ . उशिर तार कां लावितां तुही त्यास ॥ उठुन जाइन आतांच तरी खास ॥२॥ साको. हे मम तनया कोठे अससी चिलया बाळा धांवें ॥ खेळाया तूं कुठे गुंतला बाळा लौकर यावें ॥ आतत वाट पाही ।। बाळा लवकर तूं येई ॥ १ ॥ अंजनीगीत ऐसें ऐकुनी धांवत आला ॥ नमन करी हो या अतिताला ॥ मागुति नमुनी जनकजननिला ॥ ह्मणे कां बाहिले ॥ १॥ पिशितदान तें तुझें मागतो ॥ अतित तुझी बा वाट पाहतो ॥ नाही तर तो निघून जातो ॥ मन माझें भ्रमलें ॥ २ ॥ स्नेहे करुनी बाळक बोलें ॥ शिवार्पण तरी शरीर केलें ॥ तृप्त होय तो तरि मी दिधलें ॥ शरीर हे माझें ॥ ३॥ पद (शिवाज्ञेची वाट न पाहतां, ) या चालीवर. ऐसें ऐकुनि झडकरि घेउनि अपुल्या बाळाला ॥ पाकशाळेभीतरी गेली त्यासि वधायाला ॥ ४० ॥ चिलयाचें तें चुंबन घेऊनि हृदयीं धरि त्याला ॥