पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२११

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय चौदावा. परनारी खचित असे मी न वरीरे ॥ सुरत कसे घडे तरी सांग मलारे ॥ इंद्रिय तरि दमन तुवां नाहीं-केलिरे ॥ तपस्वि तरि कोण तुला मणिल सांगरे ॥ १ ॥ साकी. दुर्गेवरि मी रुसून आलों नाहिं कधी बघणार ॥ तिचे वदन ते, तसें नामही नाहिं कधी घेणार ॥ स्वप्निंहि, तूं समजे ॥ मम दोल मनीं तूं उमजे ॥१॥ दिंडी. पती माझा रागिष्ट फार आहे ॥ त्रिभूवन हैं जाळील सर्व पाहे ॥ अणूभर ही गोष्ट त्या श्रूत होई ॥ ह्मणुनि भीती फारची मनीं येई ॥ १॥ बहू काळाची कठिण तरी आहे ॥ दक्ष यागी घातली उडी पाहे ॥ पुढे गेली पर्वताचिये पोटीं ॥ पुन्हा वरली मी परी कपटि मोठी ॥ २ ॥ तंहि कपटी आहेस तीजहनी ॥ स्वधुनी कां ठेविली शिरि जपूनी ॥ भवानी ती तुजहून भोळि आहे ।। त्यजशि तिजला आश्चर्य किती हो हे ॥ ३ ॥ परस्त्रीला देखुनी धांव घेशी ॥ मिठी मारुनि वेडाच कसा होसी ॥ तपश्चर्या ती पूर्ण कशी होई ॥ याच योगाने देह नरकिं जाई ॥ ४ ॥ क्षणामध्ये सृष्टिची घडामोड ॥ शुंभ निशुंभ जिंकुनी करी मोड । अशी जरि ती येऊनी प्रार्थि माते ॥ परी नाहीं मी ऐकणार तीते ॥ ५ ॥ तिच्या संगें बोलणे वयं केलें ॥ तुझे आधिन जाहलों याच वेळें ॥ जिथें नेशी येईन तिथे जाण ॥ तुझें वचनाधीन मी खचित मान ॥ ६ ॥ साकी. दोन वेळरे तुजला वरिलें तिची गती केली ही ॥ माझा पाडचि काय तुला मग टाकुनि तूं मजलाही ॥ केव्हां जांसिल रे ॥ काय तुझा तरि नेमचिरे ॥१॥