पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. पद. ( जाउं नकारे विषया, ) या चालीवर. दंततेज तें देई वैभव माणिक खाणिला ॥ खड्यालाही सुरंग येई पाहुनि तेजाला ॥ धृ०॥ तनुसुगंध तो वरवर जातो भेदुन गगनाला ॥ पदमुद्रा त्या जेथें उमटती तेथे त्या वेळां ॥ सुगंध कमळे उगवति सारी त्याचे सुगंधाला ॥ वेधनि घाली प्रदक्षिणा त्या वसंत बह वेळां ॥ अनंत चपळा लाजुनि जाती पाहुनि रूपाला ॥ नेत्र उघडुनी रूप पाहुनी शंकर तो धाला ॥ पायीं पैंजण रुणझण वाजति कारतां नत्याला ॥ क्षुद्रघंटा रसाल गर्जती त्यांतचि त्यावेळां ॥ करिं कंकणे झणत्कारिती करितां भावाला ॥ भ्रलता चाप चढवुनि ओढी तीव्रचि बाणाला ॥ नयनबाण त्या कामशत्रुला मारी त्या वेळां ॥ चाल ॥ . पाहुनि ऐशा सतेज रूपाला ॥ पंचशराने पंचवदन मोहिला ॥ .. जप तप विसरुनि तीस पुसू लागला ॥ चाल ॥ कोणाची गे कामिनि तूं तरी सांगे यावेळां ।। कामानल मम शांत करीगे देउनि सुरताला ॥ १ ॥ . .. दिंडी वदनचंद्रा पाहुनी तुष्ट झालें ॥ चकोरनयन मम फार याच वेळें ॥ वरी मजला आधीन तुझ्या झालों ॥ कृपा करिगें तूं शरण तुला आलों ॥१॥ पद. (रामचंद्र नाही घरी, ) या चालीवर. · · रूपवती त्याजाल उमा किन्निमित्य रे ॥ ५ कैलासा त्यजुनि असा फिरसि वनीं रे ॥