पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय चौदावा. सर्वाभिमान टाकुनि देवा शरण तुला मी आलें ॥ दर्शन दे मजला ॥ अभिमान सर्व तो गेला ॥ १ ॥ सगळी तत्वें शोधुनि बघतां साक्षा शेवटिं होते ॥ तैसें ती हो हिमाचली मग पाही शिवरूपाते ॥ स्वात्मसुखी झाला ॥ तल्लिन झाकुनि नयनाला ॥ २ ॥ दिंडी श्वशुर गृहिँ का येउनि वास केला ॥ परी शेवटि की लाभ मला झाला ॥ याच रूपें मी जरी जवळि जाई ॥ विलोकुनि मज राग तो त्यास येई ॥१॥ अंजनीगीत. भिल्लीणीचा वेषं धरूनी ॥ शिखिपिच्छाचे वसन करूनी ॥ ऐशा वेर्षे मुरहरभगिनी ॥ चालली सत्वरी ॥ १ ॥ अनंत कमळे भवांड माळा ॥ त्रिभुवनसुंदरि गुफी हेळा ॥ नत्यगायन तें करुनि मोहिला ॥ स्मर हर तो तरी ॥२॥ पद ( परम सुवासिक पुष्पें, ) या चालीवर. अनंत शक्ती जिच्या भोवती विराजिती त्या बहुत रिती ॥ यानी बसुनी अष्टनायका रूप पाहुनी बहू भुलती ॥ ५० ॥ किन्नर गायक तन्मय होती पाहुनि तियेची नत्यगती ॥ प्रवाह सारे खुंटुनि जाती वैरभाव तो पशु त्यजती ॥ निश्चळ झाला पवन क्षणभरी विधिकुरंग ते ही भ्रमती ॥ कुंभिनि सोडुनि येऊ पाहे वरवर तरि तो फणीपती ॥ अंगिचा तो सुगंध घ्याया निर्जर शटपद ते होती ॥ चंडकिरण तें शीत जाहलें काय नवल हे जन ह्मणती ॥ देवांगना हि ह्मणती तेव्हां काय तरी हे रूप अती ॥ ओवाळूनि हो आह्मी जाऊं समस्त की हो या वदती ॥ आदिजननिचें अपार लाघव शक्रविधी ते न नेणती ॥ १ ॥