पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२०८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०० संगीत शिवलीलामृत. एक उभे हो सदा सर्वदां एकनभ विलोकिती ॥ कांहीं वायु सदां भक्षिती ॥ यज्ञयागही बहुतचि करिती हिंसा बलि दान किती ॥ करुनि ते देहा कष्टविती ॥ चौदा विद्या मिरविति लोकी सर्व कळा दाविती ॥ वाद विवाद करुनि भागती ॥ कित्येक पुराण सांगति नाचति लोको उपदेशती ॥ परी उमारमण नच पहाती ॥ चाल ॥ कुश मत्तिका किती तसें उदक नाशिती ॥ पावन आह्मी हो झालोंसे बोलती ।। त्यासहि पुसतां ते ह्मणती न चले मती ॥ चाल ॥ इतराचा तो काय पाड हो जेथे हैमवती ॥ शोधिता भागुनि गेली अती ॥ १ ॥ पद. (दोदिवसाची, ) या चालीवर. शिव रूपा ते पाहण्या साठी नारायण तप नित्य करी ॥ मघवा द्रुहीण करिती निशिंदिनि ठाव निघेना त्यास तरी ॥ धृ ॥ ऋग्वेद स्थापी कर्म मार्ग तो यजुर्वेद तो ज्ञान जरी ॥ अथर्वणवेद उपासना ती लावुन देती बहुत परी ॥ सामवेद तो गायन करितो न्यायशास्त्र तें भेद करी ॥ मीमांसक तरि कर्ममार्ग तो स्थापन करितो बहुत परी ॥ पातंजळि तो व्याकरणाचे योग शब्द हे भाग करी ॥ सर्व निरसनी उरले उत्तम वेदांती हो त्यास तरी ॥ ब्रह्म ह्मणति त्या शिवब्रह्म ते समजुनि ध्याहो तेंच तरी ॥ वेदा शास्त्रा अगम्य आहे महिमा वर्ण कोठवरी ॥ १ ॥ साकी शिव नामातें मुखीं घेऊनी शोधाया मग चाले ॥