पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२०७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय चौदावा. नाहीतर बा अव्यक्ताचे तूं कोणि पुसेना जनीं ।। मायाधिन बा तूं झालासी न पुसे तुज लागुनी ।। चाल ॥ भक्ताला कैसें दाविसि वदना तरी ॥ हांसति जन सारे देखुनि तुज अंतरीं ॥ अशा स्त्री जवळी राहु नये क्षणभरी ॥ चाल ॥ वनवास तरी यापरि बरवा सत्वर जा येथनी ।। मुनिवचनाते ऐकुनि शंकर गेला दुसरे वनीं ॥ १ ॥ अंजनीगीत. इतके करूनी नारद गेला ॥ शंकर टाकी संगहि सगळा ।। निरंजनी मग वासचि केला ॥ त्या शंकरानें ॥ १ ॥ योगी ध्याती ज्याला हृदयीं ॥ शोधहि कारतां न पडे ठायीं ।। मळाग्र नसें ज्याला कांहीं ॥ जातिकुळ नसेची ॥२॥ नामरूप तें गुणातीत ही ॥ गोत्रवर्ण ज्या आश्रम नाहीं ॥ शोधुनि थकले वेद सर्वही ॥ कोणा अंत न मुळीं ॥ ३ ॥ पद. ( सखे अनुसये, ) या चालीवर. सख्या घेऊनी जगदंबा ती ॥ शोधा जाई शंभूच्या ती ।। गिरीकंदरीं हिंडे हो, ती ॥ भागुनि गेली जगदंवा ती ॥ तीर्थे सगळी जी जीं होतीं ॥ शोधुनि पाही सर्व तरी ती ॥ सर्वांना ती झाली पुसती ॥ कोणी तिजला मार्ग न वदती ॥१॥ .. पद ( श्रीसांबाच्या समान देवत, ) या चालीवर. . पंचाग्नीते साधन करिती धूम्र सदां सेविती ॥ मस्तकी जटा बहुत राखिती ।। एक नग्नची एक नयन ही सर्वकाळ झांकिती ।। कांहीं मौन धरुनि राहती ॥