पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. साको गौरीशंकर खेळ खेळती आनंदाने पाही ॥ अकस्मात तों तेथें आला कमलोद्भवनंदन ही ॥ ब्रह्मविणा हातीं ॥ गायी मुखिं शिवलीला ती ॥ १ ॥ एक क्षण तो स्वस्थ होउनी खेळ विलोकी नयनीं ॥ रंग न ये तो खेळाला हो पण केल्या वांचूनी ॥ अवश्य ते ह्मणती ॥ पण मग दोघे ही करिती ॥ २॥ जिंकिल त्याला एक वस्तु ती द्यावी हो दुसऱ्याने ॥ करुनी पण मग खळं लागली दोघे आनंदाने ॥ प्रथम डाव जिंकी ॥ व्याघ्रांबर ती घेई की ॥३॥ हिंडी दुजा डावहि जिंकिला भवानीनें ॥ घेतले तें गजचर्म अंबिकेनें ॥ एक मागें एक ती डाव जिंकी ॥ आयुधे ती सर्वही हिरुनि घे की ॥ १ ॥ श्लोक. जो तो जिंकी डाव ती अंबिकाहो ॥ वस्तू साऱ्या जिंकिल्या त्या तिणे हो॥ लावी शंभूनंदिही शेवटाला ॥ देवीने तो. नंदिही जिंकियेला ॥१॥ . साकी कौपिन सोडुनि दिगांबर तरी शंभू तेव्हां झाला ॥ ऐसें पाहुन गदगद हांसे नारद त्या समयाला ॥ तुझा स्त्री जिंकी ॥ तुमचा महिमा गेला कीं ॥१॥ पद. (घेउनि मुशाफर वेश, ) या चालीवर. सृष्टी अवघी मायाधिन तूं निराकार निर्गुणी ॥ चराचर तरी मायाधीनची ठेवी रे समजुनी ॥ इणेच दिधलें सगूणपण ते पाही तुज लागुनी ॥