पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२०५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय चौदावा.:. संशय भलता का तार घेसी नारि नव्हे ती तरी॥ सखये नीरचि धरिलें शिरीं ॥ स्त्रीवदनचि ते कोठुनि दिसतें मस्तकी जळांतरीं ॥ नाथा संशय दूराचे करी ॥ संशय भलता कां तरि घेसी वदन नन्हें सुंदरी ॥ वारिज ते दिसतें तुज में शिरीं ॥ कमळाला ते.कुरळ केश हो कृष्णवर्ण ते तरी ॥ कोठुनि दिसती हो त्यावरी ॥ संशय-भलता कां तरी घेसी केस नव्हे संदरी ॥ कमळी मिलिंद बसले वरी ॥ भिवया कैशा कमळाला त्या दिसती मज सावरी ॥ तव करणी कुणा नेणवे तरी ॥ संशय भलता कां तरि घेसी भिवया नव्हे चातुरी ॥ सलील लहरी तळपती वरी ॥ चाल ॥ कमलनयन कसे आकर्णचि दीसती ॥ नेत्र नव्हे ते जळीं मीन खेळती ॥ कमंडलसम कां स्तनयगले शोभतीं ॥ चाल || स्तन नव्हे ते चक्रवाकची बसली ती साजिरी ॥ गंगानदीचे दोन्ही तिरीं ॥ १ ॥ .. पद. . (कारे इतुकी बळजोरी, ) या चालीवर. एकाचे ते अनेक करुनी ॥ दाखवितां तुह्मी भारी ॥ मौनें तुमचे चरण धरावें ॥ तव बोलचि प्रमाण जरी ॥१॥ अंजनीगीत. मांडुनि मग तो सारिपाटही ॥ खेळे पार्वति नीलकंठ ही ॥ खेळ ऐका भक्त होति ही ॥ श्रेष्ट त्रीजगती ॥ १ ॥