पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२०४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. स्कंदाने बघ कर्णचि धरिला || बोले कठिणचि त्यजुनी ममता ॥ तब साकारे नयनचि दिसती ॥ ऐकुनि हांसे तेव्हां माता ॥ . स्कंदा कारे ऐसें वदसी ॥ शिक्षा लाविन तुज मी आतां ॥ नेत्र मोजिले याने माझे ॥ नको नको मी ह्मणतचि असतां ॥ मोजाले याने शुंडा माझी ॥ अन्याय हा थोरचि पहातां ॥ ताडण करि गे माते स्कंदा ॥ त्यावर झाला स्कंद बोलतां ॥ १ ॥ साकी. . याने माझे हस्त तरी कां मोजावे गे माते ॥ कारमुख त्यावर सांगुं लागला त्याच्या अन्यायातें ॥ गौरी शंकर हो । ऐकति त्याच्या वचना हो ॥ १ ॥ कामदा. (या चालीवर.) हा मला तरी भेडसावुनी ॥ काय बोलला घेइ ऐकुनी ॥

  • पोट कां तुझे थोर जाहलें ॥ मोदकास कां बहुत भक्षिले ॥ १ ॥

बोल ऐकुनी हांसती तरी ॥ शंभु पार्वती फार अंतरीं ॥ प्रीतिनं तया हृदयिं ती धरी ॥ समजुती करी बहुत सत्वरी ॥२॥ आर्या मदनातक तो त्यावार, सिंहासनिं स्वस्थ बैसला असतां ॥ .. जगदंबा हास्य करी, शंभूच्या त्या मुखाकडे बघतां ॥१॥ पद (छेकापन्हुति, ) या चालीवर. विरूपाक्ष तो तेव्हां बोले हांससि का मुंदरी ॥ सांग सखे कारण मजला तरी ॥ धृ०॥ . जटामुगुटिं त्या, ललना पाहुनी हांसें ये मज तरी ॥ कोठुनि आणिली ती सुंदरी ।। । .