पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२०३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय चौदावा. इंद्र शशि रवि ते सुर प्रसवलीस ॥ मनोहर ते पाहतां दिसति खास ॥ लंब नासिक हे कर्ण थोर ऐसा ॥ एकदंतचि हा प्रसवलीस कैसा ॥ २॥ अंजनीगीत स्कंद बोल ते ऐकुनि कर्णी ॥ हासू लागला त्रिशूलपाणी ॥ तैशी ती ही हिमनगनंदिनि ॥ पाहुनि त्या हांसे ॥ १ ॥ स्कंद ह्मणे हो माझे आई ॥ स्तनपान ते मजला देई ॥ जगदंबेने मग त्या समयीं ॥ विघ्नेशा उतरिलें ॥ २ ॥ मांडीवर मग षण्मुख घेउनी ॥ स्तन जो घाली त्याचे वदनीं ।। पांचमुखें ती आक्रंदोनी ॥ रडू लागली ॥ ३ ॥ पद ( उद्धवा शांतवन कर जा, ) या चालीवर. देखुनि ऐसे गणराजा, हांसे गद गद त्या वेळां ॥ कैसा सुत हा तव अंबे ॥ रडतो किति मोठ्याने ॥ देसि एक स्तन तो वदनीं ॥ बसनि स्वस्थ मनाने ॥ चाल ॥ रडती पांच मुखें त्यांना ॥ कोठुनि देशिल स्तनपाना ॥ येइ हांसे पंचवदना ॥ मग तो बोले अंबेला ॥ देखुनि० ॥१॥ दिंडी काय बोलें गजवदन सांग माते ॥ ह्मणे षण्मुख ही कशी तरी याते ॥ तुला सम हा जाहला पुत्र खास ॥ पांच तुमाला सहा तरी यास ॥ १ ॥ बोल ऐकुनि आनंद त्यास झाला ॥ पुत्र पाहूनी तोष शंकराला ॥ पुढे दोघे खेळती भांडती हो ॥ मनी प्रीती फार ती तयांच्या हो ॥ २॥ .. पद. ( झाली ज्याची उपवर, ) या चालीवर. दोघे रडती खेळत असतां ॥ ऐकुनि धांवे गौरी माता ॥ गजवदनाला धरुनी पोटीं ॥ बोले कां तरि दोघे रडतां ॥