पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२०२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. अध्याय १४ वा. श्लोक त्रितापशमना त्रिदोषहरका दयाळू हरा ॥ त्रिभूवनवरा शिवा शशिधरा दया हो करा ।। अहर्निशिं करी तुझें स्तवन मी प्रभो शंकरा ॥ कृपा करुनि शंकरा झडकरी मला उद्धरा ॥१॥ . श्लोक देवा झाले सकळ तरि हे पूर्ण अध्याय तेरा ॥ चौदावा हा कळस तरि त्या पूर्ण होऊं पसारा ।। स्वामीचे हो जनन कथिलें गौरिचे लग्न तें ही ॥ आतां ऐका पुढिल कथना सांगतो सर्व कांहीं ॥ १ ॥ साकी. लंबोदर तो कार्तिकस्वामी लहान दोघे होते ॥ खळवि त्यांना जगदंबा ती दातुनि बहु प्रीतीते ॥ .. मांडीवर घेड़ ॥ वक्रतुंडास त्या समयीं ॥ १ ॥ स्याला देट स्तनपानचि ते घेउनि मांडीवरती ॥ शुंडादंडे टुग्ध ओढितो दावुनि बहुतचि प्रीती ॥ शुंडा फिरवी ती ।। अंबेच्या पृष्ठा वरती ॥ २ ॥ . शुंडे मध्ये पय साठवुनी पडाननाला बोले ॥ देवासहि जे दलभ अमृत प्राशन कार या वेळें || क्रोधयक्त स्वामी ।। बोले उच्छिष्ट नच घे मी ॥ ३ ॥ दिंडी. लंबनासिक तो काय तरी वोले ॥ जनानि नाहीं कां तुवां ऐकियेलें ॥ . धरुनि शंडा पाडु कां यास खालीं । कधी शिकवीली यास अशी बोली ॥ १ ॥