पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२०१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

। अध्याय तेरावा, हरहर शंभो पुराण पुरुषा ॥ पूर्ण करी तूं माझी मनिषा ॥ बाळकृष्ण या तुझे दासा ॥ सुमती ती द्यावी ॥ ४ ॥ पद. ( पावना वामना,) या चालीवर. शशिधरा हे हरा शंकरा ॥ तव पदकमली निरंतर आसरा ॥धृ०॥ शशिकर धरसी मस्तकी देवा ॥ योगि ध्याति तुज ईश्वरा ॥ १ ॥ तव० ॥ श्रीकरबाळा दाविसि रूपा ॥ कां कृपा नये ईश्वरा ॥ २ ॥ तव० ॥ चिल्वदळे ही मानुन घेई ॥ दासाला तरि उद्धरा ॥ ३ ॥ तव० ॥ तव चरणीं दे वास ईश्वरा ॥ या बाळकृष्ण किंकरा ॥ ४ ॥ तव० ॥ GENERA सार्वजानिक गावालय खेड, (पुणे.)