पान:संगीत शिवलीलामृत.pdf/२००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९२ संगीत शिवलीलामृत. साकी. ऐसें बोलुनि जाऊनि बैसे महा कपाटी जेव्हां ॥ जगज्जननि ती धावू लागली त्यास धराया तेव्हां ॥ नाही सापडला ॥ अंबा पडली धरणीला ॥ १ ॥ दिंडी अरे बाळारे वदन मला दावी ॥ हाक भारी मी दया न कां यावी ॥ स्तनी पान्हा दाटुनी फार येई ॥ कुणा पाजूं मी सांग मला काही ॥ १ ॥ साकी दुग्ध लोणि हे तुझें घेइगे ऐसें ह्मणुनी वमला ।। क्रोधे तेव्हां चापपाणि तो बोलतसे जननीला ॥ काय तरी वदला । ऐका देउनि चित्ताला ॥१॥ माझे दर्शन घेण्यासाठी येइल जी स्त्री ती हो । सप्तजन्म ती विधवा होइल भोगिल बहु दुःखा हो । त्यांची संगति ती ॥ दुःख बहुताच देइल ती ॥ २ ॥ कार्तिक मासी योगिं कृत्तिका यावर दर्शन घेई ॥ पुरूष तो वा सभाग्य होउनि वेद मुखोद्गत होई ॥ सगळ्या जातींना ॥ दर्शन लाभ सम जाणा ॥ ३ ॥ अंजनीगीत. सकल ऋषि तरी स्वामीला हो ॥ विनावति जोडुनि कर तेव्हां हो ॥ रात्रंदिन ती उमादेवि हो ॥ तळमळते पाही ॥१॥ वाराणशिला जाउनि सत्वर ॥ भेटुनि तिजला तोषित तूं कर ॥ आनंदवनी तो जाई नंतर ॥ जननिस भेटाया ॥२॥ समाधान ते त्यांचे करुनी ॥ मागुति. गेला अपुल्या स्थानी ॥ कथा अशी ही स्कंद पुराणी ॥ श्रवण करा तुह्मी ॥ ३ ॥