पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय तेरावा. साकी. पायीं धरुनी चक्रासम हो गरगर फिरवी त्याला ॥ जायं धरणीला आपटि चूर्णचि मृद्घटवत तो झाला ॥ प्राण निघुन गेला ॥ इंद्र वाजवी दुंदामला ॥ १ ॥ पुष्पें वर्षात सुरगण सारे स्तवन करति हो वाचें ॥ तारकासुर जेव्हां वधिला लहान वय बहु त्याचें ।। सप्त वर्षांचा ॥ होता कुमार तो साचा ॥ २ ॥ सर्व नगर तें इंद्रे लटनी देवस्त्रिया त्या सोडी ॥ . देव सर्वही मुक्तचि केले लागे सर्वा गोडी ॥ शंभुकुमराची ॥ वाद्ये वाजति बहु साची ॥ ३ ॥ वाराणशीस कुमार जाउन नमि तो शंकर ताता ॥ मातेला ही नमन करूनी बहु सुख झाला देतां ॥ मौंजबिंधन तें ॥ झाल्यावर कार तीर्थातें ॥४॥ .. दिंडी फपार्टी तो बैसला जाउनी हो ॥ अनुष्ठानाचे ते करी सर्वदां हो ॥ भवानी ती जाउनी त्यास बोले ॥ ब्रह्मचर्याचे तूं आजवरी केलें ॥ १ ॥ लग्न करुनी स्त्री सहित सुखें राही । गृहस्थाश्रम तूं अतां करावा ही ॥ षडानन तो बोलला अंबिकेला ॥ सांग कैशा गे स्त्रिया असति माला ॥ २ ॥ आजवर मी नाहींच पाहिल्या गे ॥ आकृती त्यांची कशी मला सांगे ॥ मज समचि तरि त्या सर्व स्त्रिया बाळा ॥ येत हांसे ऐकुनी कुमाराला ॥ ३॥ - पद. ( रामचंद्र नाहिँ घरी,) या चालीवर. तुजसम त्या सर्व स्त्रिया सत्य हे जरी ॥ वचन तुझें मान्य मला जाण तूं तरी ॥ अंतर काध यास कारन दोष मज वरी ॥ जनाने अतां स्वस्थ मनें जाइ सत्वरी ॥ १ ॥