पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१९० संगीत शिवलीलामृत. . . कामदा ( या चालीवर. ) . नयनि देखुनी इंद्र तो तरी ॥ असुर सोडि हो शक्ति त्या वरी ॥ प्रळय वजि ती काय धांवती ॥ शक्ति पाहुनी वीज लाजती ॥ १ ॥ अमर सर्वही जाति भीउनी ॥ स्तविति विष्णुला हस्त जोडुनी ॥ इंदिरावरा धांव सत्वरी ॥ शक्ति ही तरी दूर रे करी ॥ २॥ विश्वव्यापका इंदिरावरा ॥ पापनाशका सकळ भूधरा ॥ असुर मदना धांव सत्वरी ॥ शक्ति ही तरी दूर रे करी ॥ ३ ॥ दिंडी योगमाया पाठवी विष्णु खालीं ॥ तिणें त्वरितचि मग शक्ति जवळ केली ॥ शक्तिला ती फेकुनी दूर देई ॥ सकळ देवां आनंद फार होई ॥ १ ॥ आर्या. तारकमेघांतुनि हो, बाणाची वृष्टि फार ती होई ॥ जितके शर तो सोडी, तितके ते स्वामि गिळुन हो जाई ॥ १॥ नाना शस्त्रास्त्र जरी, सोडी तारक कुमार देखूनी ॥ तितके गिळून टाकी, शंभुकुमर शास्त्रसंख्यवदनांनीं ॥ २ ॥ साकी. ब्रह्मास्त्र दिले सोडुनि असुरें तेंही त्याने गिळिलें ॥ कल्पांतरुद्रासम तो दिसला भयानकचि त्या वेळें ॥ रथावरुन खालीं ॥ उतरे राक्षस त्या वेळीं ॥ १ ॥ अभंग स्वामी वरी तरी धांवें अनिवार ॥ चोळुनिया कर दांत खाई ॥ कृतांताचे परी हाक हो दिधली ॥ आला रथा खाली कुमार ही ॥ मल्लयुद्ध त्यांनी आरंभाच केलें ॥ सप्त दीन झाले युद्ध तें हो ॥ तारकासूर तो जर्जराच केला ॥ खाली आपटिला स्वामींनी हो ॥१॥