पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय तेरावा. त्यांच्या ही ॥ होती मग गर्भिणी याही ॥ चकिताच झाल्या त्या साही ॥ ॥ १ ॥ लज्जा त्यांना फार ये, ती ॥ गर्भ कागुनि फेकुन देती ॥ रक्तबिंदु ते एक होती ॥ दिव्यरुपिं हो जन्मे मूर्ती ॥ सहा मुखें हस्त शोभती ॥ द्वादश द्वादश तरी पाही ॥ अघटित करणी तरी हो, ही ॥२॥ दिंडी कार्तिकाच्या माहेन्यांत जन्म झालाः ॥ कृत्तिकेचा योग तो त्याच वेळां ॥ कुमारचि तो जन्मला महा योगी ॥ मयुरवाहन भस्म ते सदां अंगीं ॥ १ ॥ निजसुतचि हा जाणनी शंकरानें ॥ उमास्तानं त्या लावि हो अनंदाने ॥ सप्त वर्षे पूर्ण ती होत त्यातें ॥ करी पालन तोवरी उमा त्यातें ॥ २ ॥ साकी वैश्वानर तो जाउनि सांगे तेव्हां देवाला हो ॥ स्कंदपुत्र हा शिवासि झाला तोष होय अमरां हो ॥ ऐकुनि वाणी ती ॥ देव तारकावर जाती ॥ १ ॥ पद. (दिसली पुनरापि, ) या चालीवर. सेनापतित्व इंद्राने हो दिधलें कार्तिकस्वामीला ॥ दिव्य रथावरि त्यास बसवुनी अभिषेक करी हो त्याला ॥धृ०॥ देवदानव इकडे लढती परि जय आला दैत्याला ॥ देव सर्वही पळुनी येती स्तविती तेव्हां स्वामीला ॥ तारकासर तो प्रचंड मोठा स्वामी रक्षी आह्मांला ॥ देववांणि ती परिसुन स्वामी धरिती विशाळ रूपाला ॥ शिवकुमार तो नयनी देखुनि राक्षस धांवत तरि आला ॥ तेहतिस कोटी देव सर्वही उभे स्वामपिाठलिा ॥ दशसहस्रगज यांचे सम बळ होते पाही असराला ॥ बाणवृष्टि ती करूं लागला वरिवरि तरि तो त्या वेळां ॥ मोठे शूरहि भिऊनि गेले पाहुनि त्याच्या वृष्टीला ॥ १ ॥