पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८८ संगीत शिवलीलामृत. पार्वति संगें घेऊनि आला ॥ शंभ मग त्या कैलासाला ॥ सर्व देव ते प्राथिति त्याला ॥ देवा तूं पावरे ॥ ३ ॥ उप्तत्ती ती गेली खुंटुनी ॥ मन्मथ उठवी कृपा करूनी ॥ सजीव केला अनंग करुनी ॥ मन्मथ तो पुढती ॥४॥ दिंडी तारकासुर तो पुत्र अंधकाचा ॥ देव पळवी देउनी त्रास साचा ॥ शिवासी हो होईल पुत्र केव्हां ॥ हेच इच्छिति देव ते तरी तेव्हां ॥ १ ॥ चार युग ते एकांति रमत होते ॥ परी होईना पुत्र तरी त्याते ॥ असुर तार तो फारची त्रास देई ॥ देव ललना सर्वची धरुनि नेई ॥ २॥ (रुसुं नये कामिनी,) या चालीवर. राम जोशी याचें. शिवपदिं सर्वही जाति शरण मग देव हो ॥ धृ०॥ शिवास मग ते पाहण्या जाती ॥ एकांतामाधं दोघे होती ॥ कैसें तार ते आंतचि जाती. ॥ अग्नीला ते आंत प्रेषिती मग देव हो ॥ १ ॥ अतीत वर्षे हाका मारी ॥ ऐकुनि हाका मग मदनारी ॥ अतीत हाका मारी भारी || पार्वतिला तो सांगं लागे मग देव हो ॥ २ ॥ तेज माझें धरुनी घाली ॥ भिक्षा अतिता तरि या वेळीं ॥ शिवाज्ञा ती पूर्णचि केली. ॥ तेज धरुनी अग्नीला ती ह्मणे घ्यावें हो ॥ ३॥ साकी । जेथे पडले वीर्य तरी तें रेतकूप तो झाला ॥ जाणा पारा तोचि तरी हो धरवेना कोणाला ॥ .. पद. (रंग सावळा तरि अंगी, ) या चालीवर. अग्नीला मग गर्भ राही लज्जित हिंडे दिशा दाही ॥ ३० ॥ हिंडत असतां सहज पाही ॥ साहि कृत्तिका ऋषि स्त्रिया ही ॥ गंगास्नान करुनी त्या- ही ॥ तापत बसल्या त्या साही ॥ काढी गर्भ आग्नि तोही ॥ पोटिं घालि तो