पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१९५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय तेरावा. कमलोद्भव तो स्वयें करितसे साहित्य तरी सगळें ॥ नवनिधि सगळे अष्टसिद्धि त्या राबति हो त्या वेळें ॥ न्यून नसें कांहीं ॥ कैसें न्यून तरी राही ॥ ३ ॥ देवप्रतिष्ठा पूर्ण करूनी मूळ हिमाद्री आला ॥ नवरा मिरवित मंडपिं नेउनि करी मधूपर्काला ॥ लग्न घडी भरली ॥ आली ती हिमनगबाळी ॥ ४ ॥ दिडी. उभी केली ती पटा आड जेव्हां ॥ लग्न घटिका पाहेच रवी तेव्हां ॥ बृहस्पति तो अष्टके ह्मणूं लागे ॥ सावधानचि ते विधी ह्मणे वेगें ॥ १ ॥ यथाविधिनें तें लग्न पूर्ण झालें ॥ होम करिती दोघे हि त्याच वेळें ॥ जरी याज्ञिक हे मंडपांत झालें ॥ कोणि वधला नाहींच पाहियेलें ॥ २ ॥ होम करुनी ती प्रदक्षिणा घाली ॥ विधी पाही पदनखें तये वेळीं ॥ कामबाणे मूर्चीत विधी होई ॥ वीर्य याचे द्रवलेंच तये ठायीं ॥ ३ ॥ साकी. साठ सहस्रचि वालखिल्य ते तेव्हां जन्मा आले ॥ अन्याय असा नयनीं देखुनि मदनातक त्या वेळें ॥ गेला क्षोभूनी ॥ देव भांति ते पाहूनी ॥ १ ॥ छेदुनि टाकी ब्रम्ह्याचें तें शीर पांचवें तेव्हां ॥ हाहाःकार हि एकचि झाला चहूंकडे हो जेव्हां ॥ वैकुंठपती तो ॥ समाधान बहुतचि करितो ॥ २ ॥ अंजनगीत चतुर्वक तें नाम तयाला ॥ ठेविति सारे तरि त्या विधिला ॥ कामाने जो व्यापुन गेला ॥ भोगी भोगाला ॥ १ ॥ यथाविधी ते लग्न जाहलें ॥ अलंकार ते सर्वो दिधले ॥ - हिमनगाने गौरव केलें ॥ देवांचें बहुतची ॥ २ ॥