पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१९४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१८६ संगीत शिवलीलामृत. साकी चैत्रमार्स ते अष्टमिला हो मन्मथ वर्षी जाणा ।। लग्ननिश्चया करुनी ऋषि ते परताच येती स्थाना लग्न हो सत्वरी ॥ इच्छिति सुरगण हेच तरी ॥१॥ कधी होइल लग्न शिकाचे पत्र कधी त्यांना तो ॥ होउन घेइल प्राण सत्वरी तारकासुराचा तो ॥ इंद्र विधी ह्मणती ॥ येवो सत्वर लगातिथी ॥ २ ॥ पद. (जी जी कर्मे त्या प्राण्याच्या,) या चालीवरः नंदी जाउनि निरोप कळवी शंभूचा सकळा ॥ धृ ।। देवासह तो इंद्र निघाला जाई त्या गिरिला ॥ लक्ष्मीसह तो विष्ण येउनी सभेमधे बसला ॥ चतुर्वक्र ही सावित्रीसह कैलासी आला || अठ्याऐंशी सहस्र ऋषिही शिष्ये संगतिला ॥ घेउनि ऐसा ऋषिभार तरी येई लग्नाला ॥ एकादश ते रुद्र घेउनी द्वादश त्या रविला ॥ पितभूतगण वसुअष्टकही ऐसा गण जमला ॥ सिद्धचारण गुह्यक ह्यांनी मंडप तो भरला ॥ अष्टनायका किन्नर गायक मेळा तो जमला ॥ १ ॥ साकी सर्वांसह मग शंकर सत्वर हिमाचलासी आला || हिमनग येउनि समोर त्यांच्या पूजुनि ने सर्वांला ।। सुवर्णमंडप तो ॥ जानवसासी तो देतो ॥ १ ॥ शिवरूपासी पाहुनि होती विस्मित व-हाडी ते ॥ पुराणपुरुष हा वृद्धचि दिसतो ऐसें ह्मणती हो, ते ॥ सगूण नवरी ती ॥ निर्गुण स्थितीच याची तो ॥.२ ।।