पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय तेरावा. पार्वति जेथें तप करि तेथे जाई तो पशुपती ।। बटुवेष तो धरुनी शंकर पुसे भवानीग्रती ॥ काय निमित्तें तप करशी गे येथे तूं पार्वती ॥ तप कारतें मी प्राप्त व्हावया शंकर मजला पती ॥ चाल ॥ स्मशानवासि तो भिकारि केवळ तरी ॥ गजचर्म वस्त्र ते ओले अंगावरी ॥ महाक्रोधि तो व्याल भूषणे तरी !! चाल || व्याघ्रचर्म तो नित्य नेसतो योग्य नव्हे तुज पती ॥ तुला एक वर योग्य सुंदरी तो तरि लक्ष्मीपती ॥ १ ॥ साकी बोल ऐकुनी क्षोभ पावली बहुताच तेव्हां माता ॥ शंभु निंदका होई परतरं मुख न दाखवी आतां ।। शिव द्वेषि दिससी ।। सज समीप कां तरि येशी ॥ १ ॥ अंजनीगोत शिक्षा तुलां लाविन आतां । परंतु तुझी ब्राह्मण दिसतां ॥ सत्वर तुझी येथुनि परतां ।। दिसे मज चांगलें ॥ १ ॥ दुर्गेचा तो निश्चय देखुनी ॥ प्रगट होइ तो स्वरूप धरुनी ॥ जयजयकारचि तिणे करुनी ॥ चरण दृढ धरिले ॥ २ ॥ प्रसन्न झालों मागे सत्वरी ॥ अंबा बोले हे मदनारी ॥ आर्धांगी मज करी सत्वरी ॥ इच्छा हीच असे ॥ ३ ॥ ठाव देइन तुला सुंदरी । कैलासी मग जाय अवसरी ॥ पितग्रहीं ती अंबा झडकरी ॥ गेली तेव्हां हो ॥ ४ ॥ दिडी. सप्तऋषिला पाठवी हिमनगासी ॥ हिमनगाने दाविलें प्रेम त्यासी ॥ भवानीला ती अरुंधती पाही ॥ ह्मणे जोडा मिळणार असा नाहीं ॥ १ ॥