पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१९२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत. शंभू तेव्हां नयन उघडी पाहि तो काम तेर्थे । अन्यायी जो खचित ठरला त्या क्षमा नाहिं जेथें ॥१॥ साकी. . भाललोचना पासुनि तेव्हां काढी वैश्वानर तो ॥ त्या अग्नीने मदन जाळिला फाल्गुनमासी तार तो ॥ दिवस पौर्णिमेचा ॥ केला नाशाच मदनाचा ॥ १ ॥ महाशब्द तो करुनी तेव्हां देती हाकचि सारे ॥ स्मरगृहाचे नाम घेउनी ह्मणती कैसे हे रे ॥ शंभो देवारे ॥ कैसी करणी केलिसरे ॥ २॥ शिवाज्ञा तरी तेव्हां पासुनि सकळ जनांला झाली ॥ फाल्गुनमासी करुनि हुताशनि जो व्रत नेमें पाळी ॥ अवदशा न बाधी ॥ विजय कल्याण तो साधी ॥ ३ ॥ श्लोक. जाळूनी रतिनाथ या परि तरी तात्काळ की ऊठला ॥ शंभ मागुति तो विचार करुनी कैलासिं की पातला ॥ ऐकनी रतिचा विलाप श्रवणी सांगे तिला सत्वरी ॥ रुक्मिण्योदरिं जन्म घेइल पती कृष्णावतारी तरी ॥ १ ॥ साकी काममदाने व्यथित होउनी भूलचि पडली त्याला ॥ कमलासन तो भोगी कन्या शापी मग मदनाला ॥ शंकर तो तुजला ॥ दहन करिल तुज चांडाळा ॥ १ ॥ पद ('बघुनि उपवना विरहाग्नीची, या चालीवर.) हिमनगकुमरी बहू तप करी शंकर व्हाया पती ॥ सप्तऋषी ते नगी जाउनी शंकरास प्रार्थिती ॥ धृ०॥ हिमनगकन्या तुवा वरावी सुंदर ती पार्वती ॥