पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय तेरावा... त्रितिय नेत्रिचा पावक तो त्याला ॥ चाल ॥ सहाय होउनि तीन ग्राम सह जाळी सैन्याला ॥ त्रिपुर जाळिलें पाहुनि देवें स्तविलें शंभूला ॥ १ ॥ ... कामदा (या चालीवर.) त्रिपुरतात तो तारकासुर ॥ प्रळय मांडिहो बहुत त्यावर ॥ अमर सर्वही दूर पळविले ॥ चंद्र सूर्य ही बांद घातले ॥ १ ॥ जान्हवीसही धरुन नेत तो ॥ देव अंगना बंदि घालतो ॥ . श्रीपती विधी इंद्र मागुती ॥ मारण्या तया युक्ति शोधिती ॥ २ ॥ साकी शंकर पार्वति एक करावी होइल पुत्रचि त्यास ॥ षण्मुख तो तरि त्याच्या हस्ते मरेल राक्षस खास ॥ आज्ञा ती दिधली ॥ मन्मथास ही त्या वेळीं ॥ १ ॥ हिमनागं शंकर तप करि जेथे तेथे सत्वर जावें ॥.... काम बाण तो तया मारुनी त्याला तूं भुलवावें ॥ . रति सह जाई तो ॥ जेथे शंकर तप करितो ॥ २ ॥ .. श्लोक (शिखरिणी.) वसंतानें केलें सकळ वन ते भूषित बरें ॥ .. उमा देहीं तेव्हां रतिहि तार ती सत्वर शिरे ।। शिवाच्या देहीं तो मदन शिरला त्याच समया । विनाशाचे वेळी विपरितहि बुद्धी तार तया ॥ १ ॥ .. ( मंदाक्रांता.) नंदी गेला बहुत दुर तो पक्षि ते घालवाया ॥ मायेला ही मदन भुलवी आणिली त्याच ठायां ।। ।