पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१९०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृत.. - साकी. सहस्र वर्षे युद्ध चाललें नाहीं राक्षस मेला ॥ राक्षस कांता पतिव्रता बह तेणें जय तो त्याला || बौध्य रूप धरितो ॥ विष्णू स्त्रियामधीं शिरतो ॥ २॥ . दिंडी. वेद सोडुनि अपवित्र शास्त्र केलें ॥ स्त्रिया कडुनी धर्म ते सोडवीले ॥ च्यभीचारहि या बहु करिती पाही ॥ ह्मणुनि दैत्याचे अकल्याण होई ॥ १ ॥ लक्ष साधुनि शंकरें धनुष्याला ॥ विष्णुबाणाचा योग तयीं केला ॥ : पाशुपतास्त्रही सोडि त्याच वेळी ॥ अस्त्र पाहुनि सर्वांस भ्रांत झाली ॥ २॥ पद. ( जाउं नकारे विषया, ) या चालीवर. सहस्र सूर्याच काय उगवले भासे सकळाला ।। उभा राहिला काळदंड कां जाळिल विश्वाला || धु० ॥ प्रळयाग्नीची शिखा सरळ ही बांधिले सोला ॥ कृतांत जिव्हा किंवा चपळा चाले प्रळयाला ॥ सप्त कोटि तें मंत्र तेज हो आलें अस्त्राला || देव दैत्यही भिऊनि गेले प्रळय समय आला ॥ न्यास सहितही मंत्र जपूनी सोडी बाणाला ॥ धरणी अंबर तडाडिले हो दिग्गज तो भ्याला ॥ . सहस्र चपला धांवति जैशा सोडुनि मेघाला ॥ अस्त्रशक्ति ती तशी चालली भासे सकळाला ॥ विमानसह ते अमर पळाले घेउनि सर्वाला || मुर्छा येऊनि असुर पडति हो सोडिति प्राणाला || चाल || त्या अस्त्राने वधिलें दैत्याला ॥ .. भस्मचि केले त्या तार त्रिपुराला ॥