पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय तेरावा. पद. ( यक्ष वदे हा देव कशाचा, ) या चालीवर. कुंभिनि स्य॑दन रवि शशि चक्रे अक्ष होत तो मंदगिरी ॥ पुरुषार्थ चार स्तंभ जाहले चार वेद ते वारु तरी ॥ विधी सारथी झाला पाही शास्त्र दोर ते घेइ करी ॥ पुराणे ती तटबंदचि ते उपपुराणे खिळे तरी ॥ कनकाद्री तो धनुष्य झाला भोगिंद्र गुणाचे होय वरी ।। वैकुंठपती बाण जाहला तेज तयाचें जाय दुरी ॥ उमानाथ तो स्यदनि चढला रसातळां तो जाय तरी ॥ कोणी त्याला उपहुं न शकती नंदी स्यंदन काढि वरी ॥ अपार युद्ध तें करुनी शंकर त्रिपुर दळाचा नाश करी ॥ १ ॥ कामदा. ( या चालीवर.) वीर भद्र तो युद्ध हो करी ॥ युद्धचक्र ते मातले तरी ॥ असुर ते तिथे बहुत मारिले ॥ पुनरपी तरी सजिव जाहले ॥ १ ॥ साको अमृत कुंडे दैत्यापाशी बहूत होती जाणा ॥ असुर मरति जे अमृत शिंपुनि सजीव करती त्यांना ॥ मेघास्त्र सोडूनी ॥ कुंडे टाकी बुडवूनी ॥ १॥ कामदा ( या चालीवर.) अंतराळिं ती त्रिपुर चालती ॥ लक्ष साधितो पार्वतीपती ॥ पाति ती कदां निमिष लााविना ॥ त्रिपुर ते परी दृष्टि येतना ॥१॥ आंगं चालला धर्म पूरहो ॥ पाहुनी तया भास होइ हो । सुरनदी इचा ओघ चालला ॥ काय श्रम तरी होय शंभुला ॥ २ ॥