पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

संगीत शिवलीलामृन. सहस्रदळांची कमळे आणुनि त्रिवर्ग पूजिति तात ॥ एक दिनी तो एक न्यून हो पडलेंचि सहस्रांत ।। आपति शिवचरणों । नेत्रकमल ते काढूनी ॥ १ ॥ अंजनीगीत मागुति आले एक न्यून हो ॥ स्वशीरकमलें अर्पिति ते हो ॥ .. पाहुनि ऐसें प्रसन्न शिव हो । उठवी मग त्यांना ॥ १ ॥ इच्छित वर ते त्यांना दिधलें । अनिवार जगी बहुताचे झाले । आणिक त्यांना शंभू बोले ॥ ऐका तें आतां ॥ १ ॥ साकी. अंतरिक्ष गगनिं त्रिपुरें दिधली आणिक तुह्मांला ती ।। सहस्र वर्षे शोधुनि पाहतां निमिषीं एकचि होती ॥ कोणापासुनिहीं ॥ तुह्मां भीती ती नाही ॥ १ ॥ दिंडी. लक्ष लावुनि मारील बाण यास ॥ तुलांसह ती जातील जळुन खास ।। वराने ते माजून फार गेले ।। त्रिभूवन ते फारची त्रासालें ॥ १ ॥ पद. ( झाली ज्याची उपवर, ) या चालीवर. देव पळविले स्थान सोडुनी ॥ पापाने ती पीडिलि धरणी ॥ धृ०॥ देवऋषि मग सर्व मिळूनी ॥ विष्णूच्या ते गेले चरणीं ॥ शंभू जवळी मग तो गेला ॥ देव ऋषीतें संगें घेऊनी ॥ सर्वांनी मग स्तवनचि केलें ॥ होय प्रसन्न तो स्तवनांनी ॥ प्रसन्न झालों तुलां कारणे ॥ इच्छित घ्यावें पूर्ण करूनी ।। त्रिपुरे आमां बहुत पीडिलें ॥ ठाव नसेहो तिळभर धरणी । शंभू बोले त्रिपरमर्दना ॥ रथ द्यावा मज लागनी ॥ समस्त देवहि तयी बोलती ॥ देऊ स्पंदन सिद्ध करूनी ॥ १॥