पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७८ संगीत शिवलीलामृत. महा स्मशान आनंद त्यास देई ॥ ह्मणुनि शंभू मागुती तिथे येई ॥ सहस्र वर्षे तपाचरीत राही ॥ पुढे कैसी जाहली कथा पाही ॥ २॥ श्लोक. हिमाचलाचे उदरास आली ॥ भवानि माता तरि त्याच वेळी ॥ मनांत पूजी शिव शंभु नित्य ॥ मिळो पती तो मजलाच सत्य ॥ १ ॥ (दोदिवसाची, ) या चालीवर. हिमनगस्त्री ती सती मेनिका मेनाक पर्वत पुत्र तिला ॥ . पार्वति कन्या तिची जाहली अवतार तिने तो धरला ।। धृ०॥ ब्रह्मांडांतहि दुसरी प्रतिमा नाही दिसली तरि मजला ॥ दुसरी प्रतिमा करितां करितां विधी इंद्र तोही थकला ॥ अप्रतिम रूप पाहण्यासाठी सुरभूसुर तो ही जमला | स्वरूपवर्णन कारतां कारतां शेषहि जाणा तो थकला ॥ १ ॥ पद. (भला जन्म हा तुला,) या चालीवर. आकर्ण नेत्र निर्मळ मुख तें लज्जित शशि देखुनी ॥ पीकहि लाजे कंठी व ऐकुनी ॥ ५० ॥ परम सकुमार वर्ण घनश्याम इंद्रनीळ गाळुनी ॥ वाटे ओतिलि ही भामिनी ॥ दंततेज ते पडतां मेदिनिं पाषाण होती मणी ॥ आदिजननि ही प्रणवरूपिणी ॥ ती झाली हो हिमनगनंदिनी वंद्यचि जी त्रिभुवनीं ॥ अनंत शक्तीची स्वामिनी ॥ चाल ॥ चरणांगुष्ठीचे तेज भासतें अती ॥ अष्टनायका या पाहुनि मान लाजती ॥ स्वामिना ॥ पाल।