पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

- अध्याय तेरावा. १७७ वीरभद्र तो नयनीं देखुनि प्राणहि गेले बहुतांचे ॥ ऋत्वीज्यांच्या खांड मिशाला हाणी फटके शस्त्रांचे ॥ . मागुति आला शंकर त्याने क्षालन केले सैन्याचें ॥ कुंडमंडपा जाळुनि टाकी शरीर कांपतें दक्षाचें ॥ १ ॥ साको मूखी दक्षा कसे निंदिले त्व तरि त्या विरुपाक्षा ॥ शिवद्वेषिया पाहे आतां लाविन तुजला शिक्षा ॥ घेऊनि शस्त्र करीं ॥ घाली मग ते दक्षशिरीं ॥ १॥ उर्ध्व करूनी शस्त्र करीचे दक्ष शीर तो छेदी ॥ वीरभद्र मग क्रोधाने हो रगडी शिर तें पादीं ॥ प्रळय थोर झाला ॥ सुरगण भिवुनी बहु गेला ॥ २ ॥ सकळ सुरांसह विधी येउनी शंकरास तो विनवी ॥ उमावल्लभा दया करुनियां दक्षा लागी उठवी ॥ शंकर तोषूनी ॥ ह्मणे लावा शिर आणुनी ॥ ३ ॥ वीरभद्र तो शिर देईना रगडी पाया खाली ॥ शिव द्वेषि जे दुराचारि हो रगडिन त्या पादतळीं ॥ जिव्हा छेदिन मी ॥ आवड नच ज्या शिवनामीं ॥ ४ ॥ सवाई जो न करी शिवपूजन जो नच पाहि नित्य शिवमंदिर त्यास ॥ निदिति श्रीपति वंदिति शंकर एक थोर कमि भांडिति त्यास ॥ दंडिन मी तरि पापि जनासचि दक्ष शीर नच देइन मी तें ॥ काय मला करतील विधी हर विष्णु नाहिं भय हो मजला तें ॥ १ ॥ दिंडी. मेषमस्तक आणुनी लावियेलें ॥ दक्ष केला सजिवची त्याच वेळें ॥ तीर्थ यात्रा करण्यास शंभु जाई ॥ एक तप तो सेवीत वनें राही ॥ १ ॥