पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१७६ संगीत शिवलीलामृत. पद. (घेउाने मुशाफर वेश, ) या चालीवर. असंख्य दळ ते संगें घेउनि वीरभद्र धांवला ॥ साठकोटि गण घेउनि मागुति शंकर तेथें आला ॥धृ०॥ शिवसूताने पुढे जाउनी कीर्तिध्वज पसरिला ॥ वारणचक्रहि असंभाव्य जार वधी सिंह एकला ॥ अपार विन्ने देखनि नयनी वक्रतुंड धांवला ॥ तैसा पडला वीरभद्र तो संहारित चालला ॥ देव सर्व ते पळून गेले सोडुनि त्या भूमिला ॥ अवदाने ती सोडुनि सत्वर ऋत्विज पळू लागला ॥ प्रळयकाळिचा पावक भासे आकांत बहु जाहला ॥ शक्रादिक ते देव कापती भूगोल दुमदुमला ॥ एक भये मळमूत्र विसर्जिति वस्त्र गळे धरणिला ॥ नैऋत्यपतिने एकाएकी काकवेष घेतला ॥ चाल || कुक्कटरूपें तो धांवें रोहिणिपती ॥ शिखि होऊनिया शिखी धांवे त्या मागुती ॥ बक वर्षे झाकी स्वरूप दक्षिणपती ॥ चाल ॥ रसनायक तो शशकाच पाही सूर्य अर्क जाहला ॥ इंद्र कीर तो नवग्रहांनी पक्षिवेष घेतला ॥ १ ॥ साकी मिधिया वरी :वीज पडावी तैसा येऊनि पडला ॥ दक्षा वरि तो वीरभद्रची षड् बाहू हो ज्याला ॥ त्रिशूळ डमरू तो ॥ चाप बाण ते करि धरितो ॥१॥ पद. ( राग सारंग.) पूषाचे ते दांत पाडिले ने फोडले इंद्राचे ॥ चरण धरूनी आपटिले बहू चरण मोडिले बहुतांचे ॥