पान:संगीत शिवलीलामृत.pdf/१८३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अध्याय तरावा. १७५ आर्या. मग मानें दक्ष ह्मणे हो, कोणी बोलाविलें तरी इजला ॥ जामात आणि कन्या, यांची आवड नसेचि हो मजला ॥ १ ॥ भ्याले सारे सुरवर, देखुनि अपमान तो तिचा नयनीं ॥ भुलला दक्ष तरि कसा, जाळिल ब्रह्मांड सर्व कोपूनी ॥ २ ॥ देखुनि अपमान असा, कोयें संतप्त होय गिरिजा ती ॥ कुंडांत उडी टाकी, भासे जास वीज भूवरी पडती ॥ ३ ॥ साकी. डळमळु लागे कुंभिनि तेव्हां शेषहि कंपित झाला ॥ कमळभवांडी हाक जाहली यमही भीउन गेला ॥ बुडालि सृष्टी ती ॥ कैशी रक्षण तरि होती ॥ १ ॥ कैलासगिरी वैकुंठहि ते तेव्हां डळमळु लागे ॥ . धाक घेउनी शिवगण पळती शंभूपाशी वेगें ॥ वर्तमान सगळें ॥ सांगति शिवगण जे घडले ॥ २ ॥ प्रळयकाळिंचा कृतांत जैसा तैसा शंकर दिसला ॥ हाक देउनी आक्रोशाने जटा अपटितां झाला ॥ वीरभद्र प्रगटे ॥ प्रळयाग्निसाच तो वाटे ॥ ३ ॥ प्रळयाग्नीचे द्वादश रबिचें तेज ओतिले वाटें ॥ नक्षत्राचा सडा होतसे वीरभद्र 6 प्रगटे ॥ स्वर्गहि डळमळले ॥ सूर्यचंद्र दिपुनच गेले ॥४॥ कुंभिान सारी आतां बुडते ऐसी हाकाच झाली ॥ दक्षगृहीं ती शोणित वृष्टी मेघाने हो केली ॥ अवचित भू फाटे ॥ दिवांध दिवसा हो भेटे ॥ ५॥ दक्षाची हो सर्व शक्ति ती निघून गेली तेव्हां ॥ जटेपासनी वीरभद्र तो झाला प्रगटचि जेव्हां ॥ . स्तवुनी शंभूला ॥ वीरभद्र निघतां झाला ॥ ६ ॥